जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / औरंगाबादेतून कोरोनाची धक्कादायक बातमी, आणखी दोन बळी

औरंगाबादेतून कोरोनाची धक्कादायक बातमी, आणखी दोन बळी

औरंगाबादेतून कोरोनाची धक्कादायक बातमी, आणखी दोन बळी

आज सकाळी आणखी 24 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 677 वर पोहोचली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद, 13 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक पाठोपाठ मराठवाड्याची राजधानी असलेलं औरंगाबाद शहर कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं आहे. शहरात आज आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा हा 17 वर पोहोचला आहे. औरंगाबाद शहरात कोरोनाबाधित 2 महिलांचा मृत्यू झाला आहे.गारखेडा परिसरातली हुसैन कॉलनीतील 54 वर्षीय महिलेला काल सोमवारी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी या महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते. मृत्यूनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले. तर शहरातील बीड बायपास रोड परिसरातील 90 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हेही वाचा - PM CARE फंडसाठी एवढी जाहिरात कशासाठी? 20 लाख कोटींच पॅकेज देणाऱ्या मोदींना सवाल दरम्यान, आज सकाळी आणखी 24 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 677 वर पोहोचली आहे. औरंगाबाद शहरात एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. शहरातील संजयनगर, पुंडलिक नगर, राम नगर, चिकलठाणा, भडकल गेट, बायजीपुरा, भीमनगर या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सिपेटला दिली भेट दरम्यान, उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज सकाळी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील सिपेट (केंद्रीय प्लास्टिक आणि अभियांत्रिकी संस्था) इमारतीस भेट देऊन पाहणी केली. हेही वाचा - एक बैल कमी पडला म्हणून गाडीला स्वत:ला जुंपलं, निःशब्द करणारा VIDEO कोरोना विषाणूच्या अनुषंगाने भविष्यातील आरोग्य सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या इमारतीची संभाव्यता लक्षात घेऊन, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून या इमारतीची पाहणी देसाई यांनी केली. या इमारतीत असलेल्या सोयी सुविधांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी देसाई यांना दिली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार चंद्रकांत खैरे, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, मनपाच्या जिल्हा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर आदींची उपस्थिती होती. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात