‘मला माहीत होतं की ती मुलगी योग्य नाही,’ जेव्हा रणबीरच्या रिलेशनशिपवर बोलल्या नीतू कपूर

रणबीर कपूर एक उत्कृष्ट नवरा व्हावा अशी नीतू यांची इच्छा आहे. त्यामुळेच त्या नातेसंबंधांवर रणबीरशी तासन् तास गप्पा मारायच्या.

News18 Lokmat | Updated On: May 4, 2019 07:23 PM IST

‘मला माहीत होतं की ती मुलगी योग्य नाही,’ जेव्हा रणबीरच्या रिलेशनशिपवर बोलल्या नीतू कपूर

मुंबई, 4 मे- कतरिना कैफ आणि रणबीर कपूरचं ब्रेकअप होऊन आता  बरीच वर्ष उलटली. पण अजूनही दोघांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिलं की, चर्चांना उधाण येतं. सध्या रणबीर आलिया भट्टला डेट करत आहे. आलिया आणि कतरिनाच्याआधीही रणबीरचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. दीपिका पदुकोणसोबतचं त्याचं ब्रेकअपही तुफान गाजलं होतं. बॉलिवूडचा कॅसिनोव्हा असं त्याला म्हटलं जातं. प्रत्येकवेळी रणबीर आपल्या नात्यात गंभीर असतो पण कुठे माशी शिंकते ते कळत नाही आणि त्याचं नातं तुटतं.

दोघींच्या बोल्ड प्रणयदृश्यांचा व्हिडिओ व्हायरल; प्रिया बापटच्या 'त्या' सीनची चर्चा

बी- टाउनमधील चर्चांनुसार रणबीरच्या ब्रेकअपला त्याचा स्वभाव कारणीभुत असल्याचं म्हटलं जातं. एका मुलाखतीत आपल्या मुलाची बाजू घेताना नीतू कपूर म्हणाल्या होत्या की, ‘तो फार भावनिक आहे. तो कोणालाही त्रास देऊ शकत नाही. नातेसंबंधातही असंच झालं. लोकांना कसं नाही बोलावं हेच त्याला कळत नाही. मला त्याच्यासोबत काय घडतं ते कळतं पण मी त्यात काहीच करू शकत नाही.’

बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल अशा शिकल्यात दाक्षिणात्य अभिनेत्री

एवढंच बोलून नीतू थांबल्या नाहीत त्या पुढे म्हणाल्या की, ‘मला माहीत होतं की ती मुलगी त्याच्यासाठी योग्य नाही. जेव्हा तो पहिल्यांदा रिलेशनशिपमध्ये आला तेव्हा मी त्याला ती मुलगी योग्य नसल्याचं सांगितलं. पण त्याला ते पटलं नाही. मी त्याला हे नातं फारसं गांभिर्याने घेऊ नको असाही सल्ला दिला होता.’

Loading...

गॅब्रिएलाच्या चेहऱ्यावर प्रेग्नसीचा ग्लो, अर्जुन रामपाल अशी घेतो काळजी

‘जेवढं तुम्ही पाहता तेवढं तुम्ही शिकत जातात. त्यामुळे मी त्याला म्हटलं की, अनेक मुलींना भेट आणि त्यांच्यासोबत वेळ घालव पण कोणासोबतही लवकर गंभीर होऊ नकोस. एकच गोष्ट वारंवार सांगून मला त्याला त्रास द्यायचा नव्हता त्यामुळे मी एकदा माझं मत सांगून तिथून निघून जायचे.’

या आजींबरोबरच्या फोटोमुळे मलायका झाली ट्रोल, युझर्स म्हणाले तुम्ही तर एकाच वयाच्या!

रणबीर कपूर एक उत्कृष्ट नवरा व्हावा अशी नीतू यांची इच्छा आहे. त्यामुळेच त्या नातेसंबंधांवर रणबीरशी तासन् तास गप्पा मारायच्या. नातेसंबधांवर रणबीरशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘मी माझ्या लग्नाच्या चांगल्या वाईट गोष्टी त्याच्याशी शेअर करते. तो माझा सर्वात चांगला मित्र आहे. माझ्या मनातल्या अनेक गोष्टी मी त्याला सांगते. आता मात्र त्याच्यात बदल झालाय. त्याची वागणूकही बदलली आहे. तो फार जबाबदार झाला आहे. तो एक चांगला नवरा व्हावा अशीच माझी इच्छा आहे.’

VIDEO VIRAL प्रियांका चोप्रा झाली सोफी टर्नरची ब्राइड्समेड; लग्नात केला धमाल डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2019 07:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...