

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सध्या त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स गरोदर असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर प्रत्येक दिवशी त्याच्या आणि गर्लफ्रेंडचे अपडेट समोर येत असतात.


अर्जुन एका चांगल्या प्रियकरासारखा सध्या गॅब्रिएलाची पूर्ण काळजी घेताना दिसत आहे. नुकतंच दोघांना मुंबईत एका क्लिनिकच्या बाहेर पडताना पाहण्यात आलं. गॅब्रिएला लग्नापूर्वीच गरोदर राहिली आहे.


23 एप्रिलला अर्जुनने गर्लफ्रेंडसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देताना अर्जुनने लिहिले की, ‘गॅब्रिएला माझ्यासोबत असणं हा माझ्यासाठी एक आशीर्वाद आहे.’ यासोबतच त्याने ग्रॅबिएलाला येणाऱ्या मुलाबद्दल शुभेच्छा दिल्या.


अर्जुन आणि त्याची गर्लफ्रेंड नुकतेच क्लीनिकच्या बाहेर कॅज्युअल लुकमध्ये दिसले. अर्जुनने पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि हिरव्या रंगाची पॅन्ट घातली होती. तर गॅब्रिएलाने पुर्ण पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. दोघंही फार सुंदर दिसत होते. गॅब्रिएलाच्या चेहऱ्यावर प्रेग्नसीचा ग्लो स्पष्ट दिसत आहे.


अर्जुनला जेव्हा गॅब्रिएला गरोदर असल्याचं कळलं तेव्हापासून तो तिची जास्त काळजी घ्यायला लागला. आता गॅब्रिएलासोबत तो जास्तीत जास्त वेळ घालवतो. या फोटोमध्येही स्पष्ट दिसतं की तो गॅब्रिएलाची किती काळजी घेतो.