मुंबई, 4 मे- प्रिया बापट या नावाला वेगळी ओळख द्यायची काही गरज नाही. प्रत्येक मराठी मनासाठी हे नाव ओळखीचं आहे. पण आता अमराठी लोकांमध्येही या नावाची क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘हॉटस्टार’वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सिटी ऑफ ड्रिम्स’मुळे सध्या प्रत्येकाच्या तोंडी प्रियाचंच नाव आहे. आता तुम्ही विचार करत असाल की नेमकी या वेबसीरिजमध्ये असं काय आहे की प्रिया बापटचीच चर्चा होत आहे. नागेश कुकनूर दिग्दर्शित राजकारणावर बेतलेल्या या वेब सीरिजमध्ये अर्ध्याहून जास्त कलाकार हे मराठी आहेत. काल ३ मे रोजी ही वेबसीरिज सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आली. ‘हॉटस्टार’वर या वेबसीरिजचा पहिला भाग सर्व पाहू शकतात तर त्यानंतरचे भाग हे प्रीमियम असणाऱ्या प्रेक्षकांसाठी आहे. मराठी मालिकांमध्ये काम करणारी ‘ती’ चालवते रिक्षा, बोमन इराणींनी शेअर केला व्हिडिओ
प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न दुसऱ्यांदा मोडलं, Instagram वरच्या ‘या’ फोटोंमुळे झालं उघड या वेबसीरिजमधला प्रियाचा एक बोल्ड सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सर्वसामान्यपणे सिनेमांमध्ये अशाप्रकारची प्रणयदृश्य करायला अनेक अभिनेत्री सऱार्स नकार देतात. पण नेहमीच गर्ल्स नेक्स्ट डोअरच्या भूमिका करणाऱ्या प्रियाने हा सीन देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आतापर्यंत प्रियाने अनेक मराठी मालिकांमध्ये आणि सिनेमांमध्ये सोज्वळ भूमिका साकारल्या.
‘सिटी ऑफ ड्रिम्स’ ही तिची करिअरमधली पहिली वेबसीरिज. पहिल्याच वेबसीरिजमध्ये प्रियाचा एवढा बोल्ड अवतार अनेकांच्या पचनी पडलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर तिला अनेकप्रकारे ट्रोलही केलं जात आहे. या सीरिजमध्ये प्रिया पोर्णिमा गायकवाड ही भूमिका साकारत आहे. गॅब्रिएलाच्या चेहऱ्यावर प्रेग्नसीचा ग्लो, अर्जुन रामपाल अशी घेतो काळजी VIDEO VIRAL प्रियांका चोप्रा झाली सोफी टर्नरची ब्राइड्समेड; लग्नात केला धमाल डान्स