मुंबई, 20 जून : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यास सांगतात खरे पण त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ आज पवारांवर आली.
मुंबईत राष्ट्रवादीच्या मुख्यालयात संविधान बचाव मेळावा पार पडला. हा मेळावा आटोपून शरद पवार बाहेर पडले. पण त्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. ज्यांच्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती त्या महिला राष्ट्रवादीच्या काँग्रेस कार्यकर्त्या होत्या.
शरद पवारांचा 'खास' निरोप घेऊन जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंच्या भेटीला!
महिला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मंत्रालय परिसरात अचानक आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम हटावं, तसंच संविधान बचाव या मागणी करता हे आंदोलन करण्यात आले होते. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे एकच वाहतूक कोंडी झाली. नेमकं याचवेळी शरद पवार याच मार्गावरून निघाले होते. त्यामुळे काही वेळ शरद पवार आपल्याच कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडीत अडकले. अखेर पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर रस्ता मोकळा झाला.