मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

फेसबुक पोस्टनंतर पंकजा मुंडेंनी ट्विटरवरून 'BJP' हटवलं, 12 डिसेंबरला घेऊ शकतात मोठा निर्णय

फेसबुक पोस्टनंतर पंकजा मुंडेंनी ट्विटरवरून 'BJP' हटवलं, 12 डिसेंबरला घेऊ शकतात मोठा निर्णय

पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्या सध्या शांत असून त्याचं नेमकं काय चाललंय याची चर्चा गेली काही दिवस सुरू आहे.

पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्या सध्या शांत असून त्याचं नेमकं काय चाललंय याची चर्चा गेली काही दिवस सुरू आहे.

पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्या सध्या शांत असून त्याचं नेमकं काय चाललंय याची चर्चा गेली काही दिवस सुरू आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar

मुंबई, 02 डिसेंबर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजप हा शब्द काढला आहे. याआधी पंकजा मुंडे यांच्या प्रोफाईलचं यूजरनेम पंकजा मुंडे, भाजप असं होतं. पण आता ट्विटरवर पेजवर फक्त @Pankajamunde लिहलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची सध्या चर्चा आहे. खरंतर, पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्या सध्या शांत असून त्याचं नेमकं काय चाललंय याची चर्चा गेली काही दिवस सुरू आहे. त्यातच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली.

12 डिसेंबर हा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस आहे. त्या दिवशी आपली पुढची वाटचाल जाहीर करणार असल्याचे संकेत पंकजा मुंडे यांनी दिले होते. गेले काही दिवस मी शांत आहे. कार्यकर्त्यांना मला बोलायचं आहे. आणि मलाही कार्यकर्त्यांशी बोलायचं आहे. मात्र सध्या मला शांतता पाहिजे आहे. मला माझ्याशी संवाद साधायचा आहे. हा संवाद झाल्यानंतर पुढची वाटचाल कशी करायची हे ठरवायचं आहे असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटलंय. तसच 12 तारखेला गोपीनाथ गडावर येण्याचं आवाहनही त्यांनी केलं. त्यामुळे पंकजा मुंडे या भाजप सोडणार का? अशा चर्चा सध्या सुरू आहेत.

मोठी बातमी - देवेंद्र फडणवीसांना धक्का, आणखी एका आमदाराने सोडली साथ

पंकजा मुंडे भाजप सोडून वेगळी वाट निवडणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पंकजा मुंडे यांचे विश्वासू महादेव जानकर यांनी मात्र न्यूज18 लोकमतशी बोलताना ही शक्यता फेटाळून लावली. पंकजाताई या कुठेही जाणार नाही, त्या भाजपमध्येच राहणार असल्याचंही ते म्हणाले. सोशल मीडियावर काय चर्चा होते त्याला काही अर्थ नाही. विधानसभा निकालानंतर त्या शांत आहेत हे खरं असलं तरी त्या लवकरच सक्रिय होतील असंही ते म्हणाले होते.

12 डिसेंबर या गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी पंकजा मुंडे शक्ती प्रदर्शन करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. परळीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता.

" isDesktop="true" id="422185" >

First published:

Tags: Pankaja munde