मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

JNU हिंसाचारामागे भाजपचा हात होता, रोहित पवारांचा घणाघाती आरोप

JNU हिंसाचारामागे भाजपचा हात होता, रोहित पवारांचा घणाघाती आरोप

'तब्बल 3 तास विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. पण तोपर्यंत पोलीस काय करत होते?' असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

'तब्बल 3 तास विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. पण तोपर्यंत पोलीस काय करत होते?' असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

'तब्बल 3 तास विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. पण तोपर्यंत पोलीस काय करत होते?' असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar

मुंबई, 06 जानेवारी : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU)इथं कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला झाला. त्यावेळी बाहेर उभे असलेले पोलीस काय करत होते अशा थेट सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाही तर JNUमध्ये झालेला हिंचारामागे भाजपचा हात असल्याची घणाघाती टीका रोहित पवार यांनी केली आहे. ते गेट वे ऑफ इंडियाजवळ बोलत होते.

'विद्यापीठात अचानक वाढवलेल्या फीमुळे साबरमी हॉस्टेल परिसरात गांधीजींच्या विचारांनी शांततेत काही विद्यार्थी आंदोलन करत होते. पण शांततेत सुरू असलेलं आंदोलन लोकांना आवडत नाही. त्यामुळे पोलिसांना न जुमानता 40 लोक विद्यापीठात शिरले आणि विद्यार्थ्यांना मारहाण केली. तब्बल 3 तास विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. पण तोपर्यंत पोलीस काय करत होते?' असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

इतकंच नाही तर या हिंसाचारामध्ये भाजपचा हात आहे. त्यामुळे JNU घटनेची कसून चौकशी झाली पाहिजे असं रोहित पवार म्हणाले. दरम्यान, या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'महाराष्ट्रात हे खपवून घेतलं जाणार नाही', असं म्हणत JNU मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

'दिल्लीत जेएनयूमध्ये झालेला हल्ला हा मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याची आठवण करून देणारा आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. मी महाराष्ट्रात असा प्रकार खपवून घेणार नाही,' अशी आक्रमक भूमिका मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी होऊन हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU)इथं कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांवर झालेला हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (ABVP)केल्याचा डाव्या संघटनांचा आरोप आहे. जेएनयूमधील या हल्ल्याचा महाराष्ट्रातूनही मोठा निषेध केला जात आहे.

शरद पवारांनीही केला निषेध

'जेएनयूचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर भ्याड आणि नियोजित हल्ला करण्यात आला आहे. तोडफोड आणि हिंसाचाराच्या या कृत्याचा मी तीव्रपणे निषेध करतो. हिंसेचा वापर करून लोकशाही मूल्ये आणि विचार दाबण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही,' असं ट्वीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

दुसरीकडे, अभिनेता रितेश देशमुख यानेही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. 'आपल्याला आपला चेहरा झाकण्याची गरज का आहे? कारण आपल्याला माहीत आहे की आपण काहीतरी चुकीचे, बेकायदेशीर करत आहोत. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यी आणि शिक्षकांवर मुखवटा घातलेल्या गुंडांनी क्रूरपणे हल्ला केल्याची दृश्य भयंकर आहेत. अशा प्रकारची हिंसाचार सहन केली जाऊ शकत नाही,' असं म्हणत रितेश देशमुख याने आपला संताप व्यक्त केला आहे.

JNUमध्ये नेमकं काय घडलं?

जेएनयूमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी (ABVP) मुखवटा घातलेल्या लोकांनी हल्ला केल्याचा आरोप डाव्या विचारसरणीचे समर्थन करणारे विद्यार्थी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना काही मुखवटा घातलेल्या लोकांनी रॉडने मारहाण केली. JNUच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष यांनी सांगितले.

First published:

Tags: BJP, Congress, NCP, Rohit pawar, Sharad pawar, उद्धव ठाकरे, भाजप, राष्ट्रवादी, शरद पवार