अहमदनगर, 05 मे : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या भागात कामाचा धडाका लावला आहे. लॉकडाउनच्या काळात स्वस्त धान्य दुकान बंद ठेवल्याचे आढळून आले असता खुद्द रोहित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत धडक कारवाई केली. दुकानदाराकडे दुकान का बंद आहे, याची विचारणा केली असता चावी नसल्याची खोटी सबब सांगत मग्रुरपणे उडवाउडवीचे उत्तरे दिली.
यावेळी दुकानाचे कुलूप तोडण्यात आले. दुकानातील शिल्लक मालाची तपशील आणि परिस्थिती पाहता त्यांनी दुकानदाराची चांगलीच खरडपट्टी काढली आणि प्रशासनाला तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा - पोटच्या 8 वर्षांच्या मुलाला बापाने दगडाने ठेचून मारलं; मृतदेह फेकून दिला जंगलात
आमदार रोहित पवार यांच्याकडे राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या. याबाबत टंचाई दौऱ्यानिमित्ताने खर्डा येथील मोहरी तलावातील पाणी साठ्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी थेट राजुरी येथील प्रगती प्रतिष्ठान संचलित स्वस्त धान्य दुकान गाठले. यावेळी स्वस्त धान्य दुकानाचे चालक शहाजी रामभाऊ राळेभात यांना बोलावून घेतले आणि त्यांना दुकान उघडण्यात सांगितले असता त्यांनी चावी नसल्याचे उडवाउडवीची उत्तरे दिली.
नंतर दुकान तपासणीचा अहवालात एप्रिल आणि मे महिन्याचा धान्य दुकानदार शासनाकडून गहू 106.50 क्विंटल, तांदूळ 151.50 क्विंटल, साखर 1.90 क्विंटल अंत्योदय लाभार्थीसाठी देण्यात आली होती. त्यापैकी धान्य वाटप केल्यानंतर दुकानात सहा क्विंटल गहू, तांदूळ 15.79 क्विंटल, व अंत्योदय साखर 75 किलो साठा जास्त आढळून आला.
हेही वाचा -VIDEO: Live करताना रिपोर्टरने घातली नव्हती पॅन्ट, कॅमेरा झूम झाला आणि...
त्यानुसार धान्य दुकानदाराने पॉस मशीनवर स्वत:च्या अंगठ्याने पावत्या काढून लाभार्थ्यांना धान्य वाटप केले नसल्याचे स्पष्ट झाले असून लाभार्थ्यांना वंचित ठेवले असल्याचा अहवाल दिला आहे. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी धान्य दुकानदार शहाजी राळेभात यास तपासणी अहवालात नमूद केलेल्या त्रुटीचा खुलासा 48 तासात न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे पत्र दिले आहे.
संपादन -सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.