जमशेदपूर, 5 मे : सध्या देशभरात कोरोनाचं (Covid -19) संकट घोंगावत आहे, अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एमजीएम ठाणे क्षेत्रात चडरी जंगलातील 8 वर्षांच्या एका मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी याबाबत पोलिसांनी माहिती दिली. काही सर्वेनुसार लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात घरगुती हिंसाचाराच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. ही बाब चिंताजनक आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास केल्यास त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. एका 8 वर्षांच्या मुलाला अत्यंत क्रुरपणे दगडाने ठेचून मारले होते आणि त्याचे शव जंगलात फेकून दिले होते. यावेळी जंगलात लाकडं तोडण्याठी गेलेल्या काही नागरिकांनी हे पाहिलं व पोलिसांना माहिती दिली. वडिलांवर हत्येचा आरोप पोलिसांनी पुढे केलेल्या तपासानुसार हा मुलगा आझादनगर येथील राहणारा आहे. मृत मुलाच्या कपड्यांवरुन त्याच्या आईने ओळख पटवली. कौटुंबिक वादातून त्याचे वडील शमशेर यांनी आपल्या 8 वर्षांच्या मुलाला जीवे मारल्याचा आरोप मृत मुलाच्या आईने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी शमरेशला ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वादामुळे मृत मुलगा समीर आपल्या आईसोबत दुसरीकडे राहत होता. तीन महिने महिला शमशेर यांच्याकडे गेली होती. सोमवारी सकाळी शमशेर घरी आला व तो समीरला सोबत घेऊन गेल्याचे महिलेने सांगितले. त्यानंतर मात्र समीरचे शव जंगलात आढळले. त्यामुळे शमशेर यांच्यावर आरोप पाहता त्यांना अटक करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. याशिवाय समीर याची आई यांच्याकडूनही चौकशी केली जात आहे. संबंधित - कोरोनाशी लढणारी अशीही ‘आमची मुंबई’, जमिनीखालीही पार पाडले जात आहे कर्तृव्य! काय म्हणायचं याला! वाईन शॉपमध्ये घुसला आणि 95 हजारांची दारू घेऊनच पडला बाहेर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.