ही घडी टीका- टिप्पणीची नव्हे, राष्ट्रवादीकडून पियूष गोयल यांच्या कामाचे कौतुक

ही घडी टीका- टिप्पणीची नव्हे, राष्ट्रवादीकडून पियूष गोयल यांच्या कामाचे कौतुक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेमंत्री पियूश गोयल यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मे: राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक एक्स्पेसवरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेमंत्री पियूश गोयल यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा.. पियूष गोयल Vs उद्धव ठाकरे वाद शिगेला पोहोचला, रेल्वेमंत्र्यांनी मध्यरात्री केलं 'हे' ट्वीट

रेल्वेला देशभरात गाड्या चालवायच्या आहेत. त्यांच्यावर इतका भार असूनही चांगलं काम सुरू आहे रेल्वे मंत्रालयाच्या कामाची तारीफ करायला हवी. आजच्या घडीला टीकाटिप्पणी करणे योग्य नसल्याचं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी ही प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. कोणत्याही महत्त्वाच्या राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राज्यपालांनी शरद पवारांना भेटायला बोलावलं होतं. त्यानंतर जवळपास 20 मिनिटं ही बैठक चालली. पण बैठक फक्त सदिच्छा भेट होती. यात कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही.

हेही वाचा......मग लक्षात ठेवा, योगी आदित्यनाथ यांना राज ठाकरेंचं जशास तसे उत्तर

शरद पवारांच्या सारखे ज्येष्ठ नेते जेव्हा राज्यपालांना भेटायला जातात. तेव्हा नक्कीच महत्त्वाचा मुद्दा असणारच. राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग, शेतीच झालेले नुकसान आणि केंद्र सरकारआणि सरकारची एकेमेकांव चाललेल टीकायुद्ध त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पडद्या मागे मोठ्या हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

First published: May 25, 2020, 1:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या