मुंबई, 25 मे: राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक एक्स्पेसवरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. रेल्वेमंत्र्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर घणाघाती आरोप केले आहेत. हेही वाचा.. या लुडबुडीचा अर्थ काय? शिवसेनेचा राज्यपालांना सणसणीत टोला केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राज्यांसाठी125 ट्रेन देण्यास तयार आहोत. मात्र, राज्य सरकारने अडकलेल्या मजुरांची यादी तात्काळ रेल्वेला पाठवण्याचं आवाहन केलं होतं. रेल्वेमंत्र्यांनी याबाबत 3 ट्वीट केले. रात्री 12 वाजता पुन्हा ट्वीट केलं. ‘रात्रीचे 12 वाजले आहेत आणि 5 तासांनंतरही आमच्याकडे महाराष्ट्र सरकारकडून 125 ट्रेन्स आणि प्रवाशांची यादी आली नाही. मी रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रतिक्षा करा आणि तयारी सुरु ठेवा असे, आदेश दिले आहेत, असं पियूष गोयल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात अजूनही मोठ्या संख्येने परप्रांतीय मजूर अडकले आहेत. त्यांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी दररोज 80 रेल्वे गाड्यांची गरज आहेतय मात्र, आम्हाला केवळ 30 ते 40 गाड्या दिल्या जात आहेत. आमच्याकडे मजुरांची यादी तयार आहे. पण रेल्वे मंत्रालय गाड्यात उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावरून या वादाला तोंड फुटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आरोप केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. 23 मेपर्यंत रेल्वे मंत्रालयानं 520 रेल्वे उपलब्ध करून दिल्या. उपलब्ध करुन देण्यात आलेल्या या रेल्वेच्या माध्यमातून जवळपास 7 लाख 32 हजार कामगारांना घरी पोहचवता आलं. यादरम्यान 65 रेल्वे केवळ महाराष्ट्र सरकारची तयारी नसल्यामुळे रद्द कराव्या लागल्याचे रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सरकारच्या नोडल अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. श्रमिक रेल्वे सोडण्यासंदर्भातचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेळ घेतला त्यामुळे नियोजित केलेल्या 65 रेल्वे रद्द कराव्या लागल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. नाशिक, धुळे, अमरावती, चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये श्रमिक रेल्वे सुरू करण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून मागणी केली नसल्याचं दिसून आल्याचं निरीक्षणही मध्य रेल्वेकडून या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
I hope that the Government of Maharashtra will fully cooperate in the efforts made for the benefit of migrant labourers.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 24, 2020
हेही वाचा… नाशिक कनेक्शन! योगी आदित्यनाथ धमकीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर संजय राऊत यांनी लगावला टोला.. महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियूष गोयल यांना फक्त एक विनंती आहे की, ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये म्हणजे झालं, अशा शब्दांत संजय राऊत यांना टोला लगावला आहे.