पुढच्या 5 वर्षात जेलमध्ये पाठवणार, रॉबर्ट वाड्रावर मोदींचं गंभीर वक्तव्य

पुढच्या 5 वर्षात जेलमध्ये पाठवणार, रॉबर्ट वाड्रावर मोदींचं गंभीर वक्तव्य

शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना वाटत होतं आपल्याला कुणी हात लावू शकत नाही. पण आम्ही त्यांना ईडी कार्यालयात चप्पल झिजवायला लावतो आहे. लवकरच त्यांना जेलची हवा खायला लावू, असं मोदी म्हणाले.

  • Share this:

हरियाणा, 08 मे : मला पुन्हा निवडून द्या, आम्ही पुढच्या ५ वर्षांत रॉबर्ट वाड्रांना जेलमध्ये टाकू, असं आश्वासन बुधवारी पंतप्रधान मोदींनी दिलं. हरियाणाच्या फतेहाबादमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना वाड्रांचा उल्लेख मोदींनी शेहनशहा असा केला. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी हरियाणाच्या फतेहाबादमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भाषणात मोदींनी काँग्रेस आणि रॉबर्ट वाड्रांवर टीका केली.

शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना वाटत होतं आपल्याला कुणी हात लावू शकत नाही. पण आम्ही त्यांना ईडी कार्यालयात चप्पल झिजवायला लावतो आहे. लवकरच त्यांना जेलची हवा खायला लावू, असं मोदी म्हणाले. मी आता त्यांना जेलच्या दरवाजापर्यंत घेऊन गेलो आहे. पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात त्यांना आतमध्ये करू अशा शब्दात मोदींनी वाड्रांवर टीका केली.

ते पुढे म्हणाले की, शीख दंगली झाल्या तेव्हा, ज्यांचं नाव पुढे आलं, त्यांना मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री करून काँग्रेसने देशातील नागरिकांची चिंता नाही हे सिद्ध केलं'

'PM मोदी दुर्योधन नव्हे तर जल्लाद आहेत जल्लाद'

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाभारतातील दुर्योधनाची उपमा दिली होती. प्रियांका यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानात आता बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनीदेखील उडी घेतली. प्रियांका यांनी केलेल्या विधानावरील चर्चा अद्याप थांबली नसताना राबडी देवी यांनी मोदींबद्दल एक वादग्रस्त विधान केलं.

राबडी देवी यांनी बुधवारी एक ट्विट केलं होतं. प्रियांका गांधींनी PM मोदींचा दुर्योधन म्हणून केलेला उल्लेख चुकीचा आहे. मोदींना दुर्योधन नाही तर जल्लाद म्हटले पाहिजे, असे राबडींनी म्हटलं. प्रियांका यांनी हरियाणातील अंबाला येथील एका सभेत मोदींची तुलना दुर्योधन यांच्याशी केली.

हेही वाचा :रिक्षा ड्रायव्हरनं खरेदी केला 1.6 कोटींचा बंगला, सत्य तपासताना आयकर अधिकाऱ्यांच्या आले नाकीनऊ

यावेळी त्यांनी राष्ट्रकवी रामधारी सिंह यांच्या दिनकर यांच्या कवितेचा उल्लेख केला. त्यावर राबडी देवी यांनी ट्विट केलं होतं. त्या म्हणाल्या, त्यांनी (प्रियांका) दुर्योधन म्हणून चूक केली. खर तर त्यांनी दुसरी भाषा बोलली पाहिजे. ते तर जल्लाद आहेत, जल्लाद जे न्यायधीशांची पत्रकारांना मारून टाकतात, त्यांचे अपहरण करतात. अशा व्यक्तीचे मन आणि विचार क्रूर असतील.

काय म्हणाल्या होत्या प्रियांका

PM मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर एक असं म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना दुर्योधनालाही असाच अहंकार होता आणि त्यानं दुर्योधनाचे आतोनात नुकसान झालं, असं प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या. काही मिनिटांत यावर अमित शहांनी उत्तर दिलं होतं. दुर्योधन कोण ते 23 तारखेला जनताच दाखवेल, असा पलटवार शहांनी केला होता.

VIDEO: एक हात स्टेअरिंगवर तर दुसऱ्या हातात मोबाईल, 50 प्रवाशांच्या जीवाशी खेळ

First published: May 8, 2019, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading