रिक्षा ड्रायव्हरनं खरेदी केला 1.6 कोटींचा बंगला, सत्य तपासताना आयकर अधिकाऱ्यांच्या आले नाकीनऊ

बंगळुरूच्या रिक्षा ड्रायव्हरनं 1.6 कोटींचा बंगला खरेदी केला. काय आहे त्यामागचं सत्य?

  • Share this:

सध्या इन्कम टॅक्स विभाग बंगळुरूच्या एका रिक्षा ड्रायव्हरबद्दल गोंधळात पडलेत. यानं काही दिवसांपूर्वी एक बंगला खरेदी केला. त्याची किंमत आहे 1.6 कोटी रुपये. निवडणुकीच्या धामधुमीतच ही खरेदी झाली. म्हणून या रिक्षा ड्रायव्हरचे राजकीय संबंध आहेत असं वाचलं. पण तसं काही नसल्याचं आयकर विभागानं सांगितलंय.

एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या माहितीनुसार हा दानाचा मामला आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार या सगळ्याचा संबंध अमेरिकन स्त्री लारा एविसनशी संबंधित आहे.

या माहितीप्रमाणे या रिक्षा ड्रायव्हरनं काही दिवसांपूर्वी पर्यटक असलेल्या 72 वर्षांच्या लाराला आपल्या रिक्षातून बंगळुरूला फिरवलं होतं. त्यावेळी बोलताना त्यानं आपल्या आर्थिक तंगीबद्दल तिला सांगितलं होतं.

ही घटना 2006ची. अमेरिकन लारानं रिक्षा ड्रायव्हरच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायची तयारी दर्शवली.

हळूहळू त्यांचे संबंध दृढ व्हायला लागले, तसा अमेरिकन स्त्रीनं बंगला खरेदी करण्यासाठी या रिक्षा ड्रायव्हरला पैसे दिले.

हे पैसे मिळाल्यावर ड्रायव्हरनं  कर्नाटकच्या महादेवपुरा इथल्या जट्टी द्वारकामईमध्ये 15 रुम्सचा बंगला खरेदी केला.

त्यानं अशा वेळी हा बंगला खरेदी केला जेव्हा निवडणुकीचं वातावरण तापलं होतं.

या रिक्षा ड्रायव्हरचं नाव सुब्रमणी नल्लुरल्ली आहे. त्याचं वय जवळपास 45 वर्षांचं आहे. त्याला पत्नी, 1 मुलगा आणि 1 मुलगी आहेत.

आयकर खातं अजूनही तपास करतंय. सुरुवातीला बेनामी संपत्तीच्या दृष्टीनं तपासणी केली. पण चकित करणारी कागदपत्र मिळाली.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की कागदपत्र पाहिल्यावर रिक्षा ड्रायव्हरनं सांगितलेली घटना खरी असल्याचं लक्षात आलं.

या सर्व घटनेत महादेवपुराचे विधायक अरिवंद लिंबावल्‍ली यांच्यावर लक्ष ठेवलं जातंय. ते कर्नाटक भाजपचे महासचिवही आहेत. असं म्हणतात या रिक्षा ड्रायव्हरबरोबर त्यांचे संबंध आहेत.

सध्या आयकर विभाग सुब्रमणी नल्लुरल्लीची चौकशी करतंय. भाजप नेत्यानं सांगितलंय मी एकदाच या रिक्षा ड्रायव्हरला सार्वजनिक समारंभात पाहिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 12:00 PM IST

ताज्या बातम्या