• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपचे षडयंत्र, नाना पटोलेंचा थेट आरोप

दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपचे षडयंत्र, नाना पटोलेंचा थेट आरोप

'उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे'

'उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे'

'उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे'

  • Share this:
    मुंबई, 13 नोव्हेंबर :  त्रिपुरात (tripura violence) घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात (maharashtra) उमटले आहे. अमरावती, नांदेड, मालेगावसह (malegaon) काही भागात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र  आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केली आहे. मागील दोन दिवसांपासून अमरावतीसह काही भागात घडलेल्या हिंसक घटनांचा नाना पटोले यांनी तीव्र निषेध केला आहे. 'महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे सरकार दोन वर्षापासून स्थिर असून भाजपाने हे सरकार अस्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रात अशांतता पसरवून सरकार पाडण्याचे सर्व प्रकारचे उद्योग झाले त्यात महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देशभर भारतीय जनता पक्षाच्याविरोधात तीव्र असंतोष आहे. या मुख्य मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे षडयंत्र केले जात आहे, असा आरोपच पटोले यांनी केला. कोरोनामुळे चव गेली ती परत आलीच नाही, सडक्या अंड्यासारखी लागते चव तसंच, हिंसक कारवाया करणाऱ्यांवर व अफवा पसरवणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. समाजातील दोन घटकांमध्ये तेढ निर्माण करुन त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करणे हा भारतीय जनता पक्षाचा इतिहास राहिला आहे. देशातील ज्वलंत प्रश्नावर जनतेच्या आक्राशोला त्यांना तोंड देता येत नाही, असंही पटोले म्हणाले. पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; हिंसाचारप्रकरणी 300 जणांवर गुन्हे दाखल, अटकसत्र सुरू जनतेमध्ये भाजप आणि मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाचा फटका उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये म्हणून दंगली पेटवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्षाचा हा कुटील हेतू ओळखून षडयंत्राला बळी पडू नये, राज्यात शांतता राखावी, असं आवाहनही पटोले यांनी केले आहे.
    Published by:sachin Salve
    First published: