Home /News /news /

भयंकर! गुप्तांगावर लोखंडी गजाने वार करून एकाचा खून, विवस्त्र अवस्थेत शेतात फेकलं

भयंकर! गुप्तांगावर लोखंडी गजाने वार करून एकाचा खून, विवस्त्र अवस्थेत शेतात फेकलं

अनैतिक सबंधातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बीड, 18 जुलै:गुप्तांगावर लोखंडी गजाने मारहाण करून 40 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील लाडेवडगावमध्ये घडली. बाबासाहेब चंद्रभान लाड असं मृत व्यक्तीचं नाव आहे. विवस्त्र अवस्थेत मृतदेह शेतात आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अनैतिक सबंधातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात युसुफ वडगाव पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा...बॉलिवूड गायिकेचं बनावट अकाऊंट, पैसे देवून फॉलोअर्स वाढवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश? लाडेगाव शिवारामध्ये बाबासाहेब लाड याचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत फेकून मारेकरी पसार झाले आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याची माहिती युसुफ वडगाव पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेने लाडेगाव शिवारात एकच खळबळ उडाली आहे. सदरील मृत तरुणाचा मृतदेह विवस्त्र आढळून आला. अनैतिक सबंधातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या तरुणाचा खून कोणी आणि कुठल्या कारणासाठी केला असावा, याबाबतचा पोलिस तपास करत आहेत. या घटनेचे लाडेगाव शिवारात एकच खळबळ उडाली. मायलेकांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, तर दुसऱ्या मुलाला पाण्याच्या टाकीत बुडवलं दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात बीड जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. बीडमध्ये आईसह दोन मुलांचा निर्घृण खून करण्यात आला होता. ही घटना शहरातील शुक्रवार पेठ भागात घडली होती. संगीता संतोष कोकणे आणि तिची दोन मुलांचा निर्घृण खून करण्यात आला होता. हेही वाचा...राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता कोरोनाच्या विळख्यात, औरंगाबादेत उपचार सुरू संगीता आणि एका मुलाला दगडांनी ठेचून त्यांची हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या मुलाला पाण्याने भरलेल्या टाकीत बुडवून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती संतोष कोकणे याला अटक केली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Marathwada

पुढील बातम्या