Home /News /maharashtra /

राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता कोरोनाच्या विळख्यात, औरंगाबादेत उपचार सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता कोरोनाच्या विळख्यात, औरंगाबादेत उपचार सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विद्यमान सदस्य बाबाजानी दुर्रानी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

परभणी, 18 जुलै: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विद्यमान सदस्य बाबाजानी दुर्रानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं बाबाजानी दुर्रानी यांना औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हेही वाचा...पत्नीला कोरोनाची लागण! शिवसेनेच्या या मंत्र्यांनी घेतला स्वत: क्वारंटाइन होण्याचा निर्णय बाबाजानी दुर्रानी यांची शुक्रवारी अँटिजेन चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. नंतर त्यांना औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. बाबाजानी दुर्रानी यांनी स्वत: याबाबत सोशल मीडियावरून शनिवारी माहिती दिली. 'काही दिवसांपूर्वी ताप आणि सर्दी झाली होती. यानंतर कोरोनाची टेस्ट घेतली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तेव्हापासूनच आपल्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.', असं बाबाजानी दुर्रानी यांनी म्हटलं आहे. बाबाजानी यांची फेसबूक पोस्ट... 'प्रिय सहकाऱ्यांनो, सर्दी, ताप असल्या कारणाने मी कोविड-19 ची टेस्ट केली असता कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे कळले. औरंगाबाद येथील रुग्णालयात मी उपचार घेत आहे, आता माझी प्रकृती एकदम स्थिर असून कोणीही काळजी करू नये. आपल्या सर्वांचे असंख्य आशीर्वाद व सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत, त्या जोरावर लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन परत येईल. तुम्हा सर्वांचं प्रेम आहे, त्याबद्दल मी ऋणी आहे परंतु कोणीही मला संपर्क करण्याचा व भेटण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती. तुम्ही सर्वजण आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, विनाकारण घराबाहेर पडू नका आणि प्रशासनास सहकार्य करा. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय-89) यांचा कोरोना रिपोर्ट यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना पुढील उपचारासाठी निलंगा (जि. लातूर) येथून पुण्यात हलवण्यात आलं आहे. याआधी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर आता हे नेते कोरोनामुक्त झाले आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus

पुढील बातम्या