मुंबई, 17 जुलै: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर ज्याचे जितके जास्त फॉलोअर्स तितका तो मोठा सेलिब्रिटी किंवा प्रभावी व्यक्तीमत्व समजलं जातं. सोशल मीडिया हा छंदच नाही तर मोठ्या कंपन्या अशा लोकांना जाहिरातींसाठी पैसे देतात. पण आता पैसे देवून बनावट फॉलोअर्स वाढवणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा दावाही मुंबई पोलिसांनी केला आहे. हेही वाचा… ST महामंडळानं घेतला मोठा निर्णय, लॉकडाऊनमुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ! बॉलिवूड गायिका भूमी त्रिवेदी हिला सोशल मीडियावर तिच्या नावानं बनावट अकाऊंट असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर भूमीनं याबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली. अभिषेक दिनेश दौडे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. अभिषेक हा एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सदस्य आहे, असा महत्त्वाचा खुलाला मुंबई पोलिसांनी केला आहे. आरोपीने आधी भूमी त्रिवेदीचा बनावट प्रोफाइल इन्स्टाग्रामवर तयार केलं. त्यानंतर तिच्याशी गप्पा मारल्या. स्क्रीनशॉट घेतले आणि त्यानंतर इतर लोकांकडून फॉलोअर्स कसे वाढवायचे हे दाखवलं. पोलिस तपासात आतापर्यंत 176 जणांची नावे उघडकीस आली आहेत. त्यांनी पैसे देऊन आपले फॉलोअर्स वाढवले आहेत. त्यापैकी बॉलिवूडशी संबंधित लोकांसह खेळाडू आणि इतर लोक आहेत. आता या सर्वांनै बोलावून त्यांची चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मोठा काळाबाजार… सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याचा मोठा काळाबाजार आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटने अभिषेक दिनेश दौडे नावाच्या एका तरूणाला अटक केली आहे. तो एका आंतरराष्ट्रीय सोशल मीडिया रॅकेटचा भाग आहे. www.followerskart.com ही विदेशी वेबसाईट कंपनी आहे. ही कंपनी सोशल मीडिया रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अटक आरोपी दिनेश हा याच कंपनीसाठी काम करायचा, हे चौकशीत समोर आलं आहे. त्यामुळे ही वेबसाईट कंपनी आता मुंबई पोलिसांच्या रडारवर आहे. या प्रकरणी SIT स्थापन करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकारी या SIT मध्ये आहेत. संयुक्त आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेली माहिती अशी की, सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी या फसवणुकीच्या धंद्यात मॅन्युअली आणि बॉटचा देखील वापर केला जातो. बॉट ही एक ऑटोमेटेड जनरेटेड रेस्पॉन्स सिस्टम आहे. ही सिस्टम तुमचे सोशल मीडिया अकाऊंट तपापसते. हेही वाचा… धक्कादायक: मुंबईत कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण महिलेवर अतिप्रसंग तुम्ही कोणते व्हिडिओ बघता, कोणत्या पोस्ट वाचता, कोणत्या पोस्ट लाईक करता आणि तुम्ही कोणाचे फॉलोअर्स आहात या सगळ्या बाबींचा अभ्यास करुन त्याच प्रकरणाच्या मार्केटींग पोस्ट ही बॉट सिस्टम तुमच्या वॉलवर पोस्ट करते आणि चुकीच्या मार्गाने तुमचे फॉलोअर्स वाढवते. अशा चुकीच्या पद्धतीने वाढवलेल्या फॉलोअर्सचा फायदा घेवून एखादी समाजकंटक व्यक्ती समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट करुन कायदा सुव्यवस्था बिघडवू शकते, असा संशय मुंबई पोलिसांना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







