जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार, मुंबई हादरली

कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार, मुंबई हादरली

कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार, मुंबई हादरली

रात्री 11 वाजेच्या सुमारास कुर्ला एलटीटी मार्गावर 4 आरोपींनी एका महिलेवर बलात्कार केला. पीडित महिला ही कुर्ला रेल्वे स्थानकावरून लोकमान्य टिळक टर्मिनसला मध्य प्रदेशची ट्रेन पकडण्यासाठी निघाली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जानेवारी : मुंबईमध्ये महिला अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुबंईच्या कुर्ल्यामध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजेच्या सुमारास कुर्ला एलटीटी मार्गावर 4 आरोपींनी एका महिलेवर बलात्कार केला. पीडित महिला ही कुर्ला रेल्वे स्थानकावरून लोकमान्य टिळक टर्मिनसला मध्य प्रदेशची ट्रेन पकडण्यासाठी निघाली होती. एलटीटी मार्गावरून कुर्ला स्टेशन काही अंतरावर असल्यामुळे ती पायी चालत निघाली. वाटेत लघुशंकेसाठी गेली असता नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी 2 नराधमांनी महिलेवर अत्याचार केले. त्यानंतर आणखी दोन तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांनीदेखील पीडितेवर बलात्कार केला. इतकंच नाहीतर आरोपींनी महिलेकडील पैसे आणि तिचं मंगळसूत्र चोरून घटनास्थळावरून पळ काढला. इतर बातम्या - तान्हाजी-भाजप व्हिडीओवर खा. संभाजीराजे भडकले, मोदी सरकारला दिला थेट इशारा या घटनेनंतर महिलेने 100नंबरवर फोन करून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडित महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास करत 4 आरोपींना अटक केली आहे. या सगळ्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतर बातम्या - अमित शहांमुळे मोदी सरकार तोंडघशी पडलं, तुकडे-तुकडे गँगची धक्कादायक माहिती दरम्यान, सुरक्षेसाठी महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी हे कुर्ला परिसरातच राहणारे आहे. यातील एकजणावर चोरीचे अनेक गुन्हे आहेत. तर एक आरोपी सेल्समन आणि एक रिक्षा चालक असल्याचं सांगण्यात आलं. इतर बातम्या - राज ठाकरे इज बॅक! शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी मनसेचा मेकओव्हर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात