नवी दिल्ली, 21 जानेवारी : एका कार्यकर्त्याने असा दावा केला आहे की, माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तुकडे-तुकडे या टोळीविषयी कोणतीही माहिती नाही. गेल्या महिन्यात गृह मंत्रालयाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कार्यकर्ते संकेत गोखले यांनी आपल्या ट्विटमध्ये जोडले आहे. संकेत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘तुकडे तुकडे टोळी अधिकृतपणे नाही, ती केवळ अमित शहा यांच्या कल्पनेचा अंदाज आहे.’ ‘तुकडे-तुकडे टोळी’ हा शब्द डाव्या-समर्थीत गट आणि त्यांच्या समर्थकांवर हल्ला करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) एका कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्या नंतर ‘तुकडे-तुकडे गँग’ तयार झाली. त्यावेळी हा कार्यक्रम आयोजित करणार्या जेएनयू विद्यार्थी संघटनेचे प्रमुख कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. इतर बातम्या - राज ठाकरे इज बॅक! शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी मनसेचा मेकओव्हर मागच्या वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या शब्दाचा प्रयोग अनेक भाषणांमध्ये केला आहे. दिल्लीच्या एका कार्यक्रमात अमित शहा यांनी CAAच्या विरोधात प्रदर्शन करणाऱ्या लोकांचा उल्लेख करत म्हणाले की, माझी इच्छा आहे काँग्रेसचं नेतृत्त्व करणाऱ्या तुकडे तुकडे गँगला दंड ठोठावण्याची वेळ आली आहे. त्यांना शहरामध्ये हिंसा पसरवण्यासाठी दोषी मानलं गेलं पाहिजे. दिल्लीच्या लोकांनी त्याला दंड दिला पाहिजे. या महिन्याच्या सुरूवातीस गृहमंत्री अमित शहा यांनी दोनदा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप केला की अरविंद केजरीवाल यांनी कन्हैया कुमार आणि भारतविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या इतरांवर खटला चालविण्यास मान्यता दिली नाही. जेएनयू कॅम्पसवर हल्ला झाल्यापासून सोशल मीडियावर या विषयावर विद्यापीठाला वारंवार लक्ष्य केले जात आहे. जेएनयू हिंसाचारादरम्यान मुखवटा घातलेल्या लोकांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना लक्ष्य केले; ज्यामध्ये 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सोशल मीडियावर ‘तुकडे-तुकडे गँग’ वापरताना अनेक वापरकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले होते. भाजपच्या कर्नाटक युनिटनेही आपल्या ट्विटमध्ये याचा उल्लेख केला आहे. इतर बातम्या - ‘फक्त मुस्लिमांच्या आग्रहामुळे काॅंग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.