मोठी बातमी! संदीप देशपांडेसह आणखी 3 मनसैनिकांना पोलिसांनी केली अटक

मोठी बातमी! संदीप देशपांडेसह आणखी 3 मनसैनिकांना पोलिसांनी केली अटक

देशपांडे यांच्यासह इतर 3 मनसे अधिकाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : लोकल सुरू करण्यासाठी मनसेनं केलेल्या आंदोलनानंतर मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता रेल्वे पोलिसांनी मनसे सरचिटनिस संदीप देशपांडे यांना अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. देशपांडे यांच्यासह इतर 3 मनसे अधिकाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

रेल्वे आणि कोविड संदर्भात नियम मोडल्यामुळे मनसैनिकांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईची लाइफलाइन अर्थात मुंबईची लोकल कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी ठप्प आहे. लोकल सुरू करावी या मागणीसाठी मनसेचे आंदोलन पुकारले आहे.

गोव्यामध्ये रेड अलर्ट तर मुंबईत ढगाळ, महाराष्ट्राच्या या भागांत आज आसमानी संकट

संदीप देशपांडे यांच्यासह आंदोलन करणाऱ्या 3 पदाधिकाऱ्यांवर आपत्तीकाळात सरकारची कोणतीही परवानगी नसताना प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51, 52 तसंच महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2019 च्या कलम 11, त्यासह भारतीय रेल्वे अधिनियम 147, 153, 156 अंतर्गत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन, शूटिंगदरम्यान झाला कोरोना

मुंबईत कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेता मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जात आहे. पण, यामुळे चाकरमान्यांना अतोनात हाल सहन करावे लागत आहे. त्यामुळेच मुंबईतील लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी मनसेने केली होती.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 22, 2020, 9:47 AM IST

ताज्या बातम्या