ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन, शूटिंगदरम्यान झाली होती कोरोनाची लागण

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन, शूटिंगदरम्यान झाली होती कोरोनाची लागण

सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होतं. पण अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • Share this:

सातारा, 22 सप्टेंबर : मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं आज पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झालं आहे. 'आई माझी काळूबाई' या मालिकेतील 27 जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये आशालता या देखील मुख्य भूमिकेत होत्या. पण यादरम्यान 27 जणांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण झाल्यामुळे आशालता यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होतं. पण अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एक डान्स ग्रुप चित्रीकरणासाठी गेला होता. तेव्हा कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साताऱ्यातील लोणन या गावी हे चित्रीकरण सुरू होतं. सुरुवातील इथल्या गावकऱ्यांनी चित्रीकरणासाठी नकार दिला होता. राज्य सरकारने कोरोनामध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली असली तरी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे सांगितले आहे. शूटिंगदरम्यान तेथील सेट वारंवार सॅनिटाइझ करण्याबरोबर कलाकारांनी मास्क लावणे बंधनकारक आहे.

गेल्या काही महिन्यात अनेक कलाकारांनी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बिग बी अभिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक, ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी अराध्या यांनी कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते कोरोनाचा लढा जिंकून घरी परतले आहे. आता सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 22, 2020, 8:07 AM IST
Tags:

ताज्या बातम्या