मान्सून रिर्टन्सः गोव्यामध्ये रेड अलर्ट तर मुंबईत ढगाळ, महाराष्ट्राच्या या भागांत आज आसमानी संकट

मान्सून रिर्टन्सः गोव्यामध्ये रेड अलर्ट तर मुंबईत ढगाळ, महाराष्ट्राच्या या भागांत आज आसमानी संकट

गोव्यात गेल्या 24 वर्षांपासून मुसळधार पाऊस पडत असून सांगे काणकोण इथं पावसाने 180 मिलिमीटर पेक्षा जास्त हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : आज दिवसभरात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकण, गोवा भागात मुसळधार पावसाचा अंदाज तर मुंबईसह ठाणे काही भागात पावसाचा अंदाज आहे हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. आज मुंबई, ठाणे सातारा, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळा वर्तविला आहे. मुंबई-ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. गोवा आणि तळकोकणाला मुसळधार पावसाचा इशारा गोवा वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

गोव्यात गेल्या 24 तांसापासून मुसळधार पाऊस पडत असून सांगे काणकोण इथं पावसाने 180 मिलिमीटर पेक्षा जास्त हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा सर्वाधिक तडाखा भात शेतीला बसला आहे. येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली असून गोव्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे.

दीपिका आणि श्रद्धा कपूरच्या चॅट्सनंतर आता कोण आहे NCBच्या रडारवर?

या पावसामूळ वाहतुकीवरही परिणाम झाला. सांगे फोंडा, डिचोली, काणकोण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून नदी-नाल्यांना पूर आला आहे . पुराचे पाणी बागायतीत घुसल्याने भात शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे अंजुने ,साळावली आणि तिलारी धरणातील पाणीसाठा वाढल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीकिनारीच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाबरोबर वाऱ्याचा वेग ही वाढल्याने समुद्र खवळलेला आणि लाटांची उंची आणि वेग जास्त आहे. भरती ओहोटी चे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे मासेमारी करण्यासाठी समुद्रात उतरू नये असा इशारा कॅप्टन ऑफ पोर्टने मच्छीमारांना दिला आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन, शूटिंगदरम्यान झाला कोरोना

पुढचे तीन दिवस अलर्ट जारी

मुंबई-ठाणे-पालघर परिसरात हलक्या स्वरुपाचा तर तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही परिसरात पुढचे तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे तीन दिवस अति मुसळधार पाऊस असेल त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तर तळकोकणात समुद्र किनाऱ्याजवळील परिसरातील नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 22, 2020, 9:04 AM IST
Tags:

ताज्या बातम्या