S M L

मुंबईकरांचा संताप! आधी लोकल नीट करा मग बुलेट ट्रेनचं बघा

दोन शब्दांच्या या कौतुकापलिकडे मुंबईसाठी कुणीच काहीही केलं नाही असा संताप मुंबईकरांनी मंगळवारी व्यक्त केला. काही लाख कोटी खर्च करून बुलेट ट्रेन उभारण्यापेक्षा आधी लोकलची गंभीर परिस्थिती सुधारा असं आवाहन नागरिकांनी सरकारला केलं.

Ajay Kautikwar | Updated On: Jul 3, 2018 04:24 PM IST

मुंबईकरांचा संताप! आधी लोकल नीट करा मग बुलेट ट्रेनचं बघा

मुंबई,ता.3 जुलै : अंधेरीला मंगळवारी सकाळी रेल्वेचा पूल कोसळला आणि मुंबईकरांच्या संयमाचा बांध फुटला. संकट आलं की मुंबईकरांच्या स्पिरिटचं कौतुक केलं जातं. कुठल्याही परिस्थितीत मुंबईकर कधीच थांबत नाही असंही कौतुक केलं जातं. मात्र दोन शब्दांच्या या कौतुकापलिकडे मुंबईसाठी कुणीच काहीही केलं नाही असा संताप मुंबईकरांनी मंगळवारी व्यक्त केला. काही लाख कोटी खर्च करून बुलेट ट्रेन उभारण्यापेक्षा आधी लोकलची गंभीर परिस्थिती सुधारा असं आवाहन नागरिकांनी सरकारला केलं.

हजारो मुंबईकरांचा जीव वाचवणारा मोटरमन 'चंद्रशेखर सावंत'

महाराष्ट्रात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा

लोकल ही मुंबईची जीवन वाहिनी. लोकलची गती मंदावली की मुंबई ठप्प होते. मात्र ज्या प्रमाणात लोकलमध्ये सुधारणा करायला पाहिजे त्या सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. प्रचंड गर्दी, दररोज येणारे लोंढे आणि तेवढ्याचं असलेल्या सुविधांमुळे मुंबईकरांच्या हाल अपेष्टांना पारावार राहिलेला नाही. सकाळी ऑफिससाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना जीव मुठीत धरून लोकलमधून प्रवास करावा लागतो. मुंबईचे रेल्वेमंत्री अनेक झाले. रेल्वेचा कायापालट करू अशी आश्वासनही दिली गेली.

रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा देवू अशी आश्वासनं बजेटमध्ये दिली गेली. मात्र या आश्वासनापलिकडे आणि जुजबी डागडुज्जीपलिकडे अमुलाग्र सुधारणा झाल्या नाहीत. त्यामुळं दोन-पाच तासांच्या मुसळधार पावसानेही मुंबई तुंबते, लोकल सेवा ठप्प होते आणि जनजिवन विस्कळीत होते. देशाला सर्वात जास्त महसूल मुंबईमधून मिळतो मात्र मुंबईला दुभती गाय समजण्यापलकिडे राजकारण्यांनी काहीही केलं नाही असा संतप्त सवालही नागरिकांनी केला आहे.

Loading...

पूल कोसळून पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत, जाणून घ्या या महत्त्वाच्या 10 गोष्टी

रेणुका शहाणेला मुंबईची काळजी पण लोकांनी म्हटलं 'काँग्रेसवाली', ट्विटरवर ट्रोल

एखादी घटना घडली की आश्वासनं दिली जातात. मदत जाहीर केली जाते आणि पुन्हा सगळं जैसे थे होतं. त्यामुळं मुंबईची दैना झाली आहे. बुलेट ट्रेनची स्वप्न दाखवून किमान पायाभूत सुविधांकडे का दुर्लक्ष केलं जातं असा सवालही त्यामुळं ऐरणीवर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2018 04:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close