मुंबई, 03 जुलै : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. ऑफिसला जाण्याच्या वेळेत पश्चिम रेल्वे खोळंबल्याने अनेक चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सुदैवाने त्यावेळी खालून लोकल ट्रेन जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. रेल्वे बंद पडल्याने प्रवाशांनी रस्ते मार्गाने ऑफीस गाठण्याचा प्रयत्न केला. यात पावसाची भर पडल्याने रस्त्यांवरील वाहतूकही मंदावली आहे. १. सकाळी साडे सातच्या सुमारास हा पूल कोसळला. आतापर्यंत कोणतीही जीवीतहानी झालेली नसून 5 जण जखमी झाले आहेत. २. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल आणि बीएमसी कमिशनर अजॉय मेहतांशी फोनवरून बातचीत करत घडलेल्या घटनेची माहिती घेतली ३. पोलिस आयुक्तांना रस्त्यावरील वाहतुक सुरळीत ठेवण्याचं तसंच बेस्टच्या अतिरिक्त सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. ४. पश्चिम रेल्वेनुसार मध्य रेल्वेची वाहतुकही विस्कळीत झाली ५. लोकांनी पॅनिक न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ६. रेल्वे सेवा कोलमंडल्यामुळे डबेवाले जागोजागी अडकून पडले. त्यामुळे आजच्या दिवशी डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. ७. पोलिस आयुक्तांना रस्त्यावरील वाहतुक सुरळीत ठेवण्याचं तसंच बेस्टच्या अतिरिक्त सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्यात ८. एकीकडे प्रवाशांचे हाल होत असताना रिक्षावाले मात्र अव्वाचा सव्वा भाव लावताना दिसत आहेत. ९. वेस्टर्न एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. १०. पश्चिम रेल्वेची वाहतूक वांद्रे ते चर्चगेटदरम्यान सुरू करण्यात आली आहे. हेही वाचा पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत, या मार्गांवरून करू शकता प्रवास ! प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीवर चाकूने केले वार जुलैच्या पहिल्या आठवड्यात निघणारी म्हाडाची लॉटरी लांबणीवर !
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







