मुंबईत कोरोनासंदर्भात धक्कादायक माहिती, रिपोर्ट पॉझिटिव्ह पण 11287 रुग्णांना लक्षणं नाहीत!

मुंबईत कोरोनासंदर्भात धक्कादायक माहिती, रिपोर्ट पॉझिटिव्ह पण 11287 रुग्णांना लक्षणं नाहीत!

पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या तब्बल 11287 रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 26 ऑगस्ट : राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. अशात मुंबईत अनेक भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे. पण यात कोरोना रुग्णांसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या तब्बल 11287 रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.

अशात मुंबईमध्ये 18 हजार 263 करोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. करोनामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची संख्या 1134 इतकी आहे. करोनावर मात करून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 11 हजार 84 इतकी आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी 10 हजार 425 रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातल्या कोविड रुग्णांचा एकूण आकडा 7 लाखांच्यावर गेला आहे. 7 लाख 3 हजार 833 जण कोरोना बाधित असल्याची माहिती देण्यात आलीय.

EXCLUSIVE : छोटा शकीलनं दाऊद इब्राहिम आणि D कंपनीबाबत केला मोठा खुलासा!

राज्यात एकूण 5 लाख 14 हजार 790 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 329 जणांचा मृत्यू झाला. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 73.14 वर गेलं आहे. राज्यात 1 लाख 65 हजार 921 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास बेजबाबदार, काळजी न घेणारे आणि मास्क न घालणारे लोकच जबाबदार आहेत असा इशारा ICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिला आहे. भारतातल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी देत त्यांनी देशातली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं स्पष्ट केलं.

मुंबईतल्या या 2 ठिकाणी कोणीही नाही बसवत गणपती, काय आहे अख्यायिका?

भारतातील 0.29 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर 1.92 टक्के रुग्ण आयसीयूमध्ये तर 2.7 टक्के रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आलेला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 69 टक्के पुरुष आहेत तर 31 टक्के महिला आहेत. तर मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 50 टक्के रुग्ण हे 60 वर्षांच्या वरच्या वयोगटाचे आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 26, 2020, 10:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading