इस्लामाबाद 26 ऑगस्ट: भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचे मान्य केल्यानंतर हे वृत्त पाकनं मागे घेतलं दाऊद कराचीमध्ये राहात असून त्याच्या 88 दहशतवादी आणि संघटनांची यादी जाहीर केली त्यात दाऊदचं नाव असून त्याचा पत्ता हा कराची व्हाईट हाऊस असल्याच्या भारताच्या दाव्याला पाककडूनही दुजोरा देण्यात आला होता. मात्र त्यानंतर पाकिस्ताननं आपली भूमिका बदलली.
दाऊद इब्राहिम कराचीमध्ये नसल्याची माहिती आता पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयानं दिल्यानंतर मोस्ट वॉन्टेड डॉन नक्की आहे कुठे, याबाबत आता पुन्हा चर्चा झाल्या आहेत. दरम्यान CNN News18 ला दाऊदचा खास असलेल्या छोटा शकीलनं ड कंपनीबाबत महत्त्वाची माहिती दिली. यावेळी छोटा शकीलला विचारलेल्या प्रश्नांची त्यानं अशी उत्तर दिली...
प्रश्न 1- पाकिस्तान सरकारनं तू कराचीमध्ये असल्याचे मान्य केले आहे, यावर काय प्रतिक्रीया देशील?
छोटा शकील-सध्याच्या मीडिया आणि सोशल मीडियाच्या काळात तुम्हीही काहीही अंदाज बांधू शकता. दाऊदची गाडी, बंगला काहीही दाखवा ती तुमची जबाबदारी आहे. तुम्ही काहीही दाखवण्यासाठी मुक्त आहात.
प्रश्न 2- हा भारतीय मीडियाचा प्रश्न नाही, मात्र D कंपनी कराचीमध्येच राहत असल्याचे पाकिस्तान सरकारने मान्य केले आहे.
छोटा शकील- ही तुमची जबाबदारी आहे, आमची नाही. आम्ही जर इथं नाही आहोत तर आम्ही कोणाच्या मालकीचे कसे होऊ शकतो?
प्रश्न 3- D कंपनी कुठे आहे हे का जाहीर करत नाही?
छोटा शकील- आम्ही कोणत्याही सरकारला जबाबदार आहोत. आम्ही कुठे आहोत हे का जाहीर करावे? आम्ही मागील 25 वर्षांपासून सांगत आहोत की 1994 च्या स्फोटात आमचा सगभाग नाही. ते का कोणी ऐकत नाही?
प्रश्न 4- पाक लष्करानं D कंपनीची जबाबदारी नाकारली आहे असं तुम्हाला वाटतं का?
छोटा शकील- हे तुम्ही पाकिस्तान सरकारला विचारा, आम्हाला नाही. सरकार तुम्हाला उत्तर देईल.
'दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा खोटा'
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दाऊद इब्राहिमच्या उपस्थितीचा पुन्हा खंडन करत यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या निवेदनात म्हटलं आहे की दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा खोटा आहे. दाऊद पाकिस्तानमध्ये नाही. दहशतवादांना मदत करणाऱ्या देशांवर FATF ही आंतरराष्ट्रीय संघटना लक्ष ठेवत असते. त्या संघटनेने पाकिस्तानला ग्रे यादीत टाकलं होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पत खालावली होती. जागतिक वित्तीय संस्था मदतही करत नव्हत्या. त्यामुळे त्या यादीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला ही कृती करावी लागली. या आधी भारताने अनेकदा पुरावे देऊन दाऊद हा पाकिस्तानमध्ये राहत असल्याचं सांगितलं होतं. मात्र हे सर्व दावे पाकिस्तानं फेटाळून लावत आपल्या भूमिकेपासून युटर्न घेतला आहे.