Home /News /ganesh-chaturthi /

मुंबईतल्या या 2 ठिकाणी गेली दीडशे वर्ष कोणीही नाही बसवत गणपती, काय आहे अख्यायिका?

मुंबईतल्या या 2 ठिकाणी गेली दीडशे वर्ष कोणीही नाही बसवत गणपती, काय आहे अख्यायिका?

मुंबईच्या या दोन भागात गेल्या दीडशे वर्षांपासून गणपती बाप्पाची मूर्ती कोणीही घरी आणत नाही आणि प्राण-प्रतिष्ठापनाही करत नाहीत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हेच खरं आहे.

डोंबिवली, 26 ऑगस्ट : राज्यात, देशात किंवा परदेशात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सार्वजनिक असो किंवा घरगुती गणपती सर्व आनंदाने गणेशोत्सव साजरा करतात. बाप्पाची मूर्ती आणून गणेश चतुर्थीला प्राण प्रतिष्ठापना केली जाते. मात्र, कल्याण ग्रामीण भागातील बाळे आणि वडवली गावात गेल्या दीडशे वर्षांपासून गणपती बाप्पाची मूर्ती कोणीही घरी आणत नाही आणि प्राण-प्रतिष्ठापनाही करत नाहीत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हेच खरं आहे. इतकंच नाही तर सार्वजनिक मंडळसुद्धा गणपती बसवत नाही. याचं कारण आहे या दोन्ही गावांच्या मध्यस्थानी असलेलं स्वयंभू गणपतीचं मंदिर... बाळे आणि वडवली या गावांमध्ये सुमारे साडे तीनशे ते चारशे घरं आहेत. मात्र, यापैकी एकाही घरात गणेश चतुर्थीला गणपती आणला जात नाही. कारण या गावांच्या मध्यभागी गणपतीचं मंदिर आहे. या 2 गावातील ग्रामस्थ याच गणपतीचं पूजन करतात. शेकडो वर्षांपासून ही प्रथा चालत आली आहे. काळजाचं पाणी करणारी घटना, पतीच्या मृतदेहाशेजारीच रडताना पत्नीनेही सोडला प्राण घरी गणपतीची पूजा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये अनेक अडथळे येतात, असे ग्रामस्थांकडून सांगितले जाते. घरगुती किंवा सार्वजनिक गणपती ऐवजी गणेशोत्सवादरम्यान गावातील गणेश मंदिरात सात दिवस उत्सव साजरा केला जातो. यादरम्यान, गावातील मंडळी, तसेच बाहेरगावातून किर्तनकार प्रवचनकार मंडळी मोठ्या संख्येने मंदिरात येत असतात. दरवर्षी मोठ्या उत्साहात हरिनामाचा जयघोष या मंदिरात साजरा केला जातो. रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने मंदिरात कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन केले गेले नाही. ...म्हणून देशात वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; आताच व्हा सावध! ICMR ने दिला इशारा "आमच्या गावांमध्ये घरघुती गणपती उत्सव साजरा केला जात नाही. जर घरात घरघुती गणपती स्थापना केली तर कोणत्याही प्रकारचे संकट कुटुंबावर येतो. त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जात नाही. " अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ सुदाम पाटील यांनी दिली. बाळे आणि वडवली गावच्या मध्यभागी असलेल्या गणपती मंदिरात मोठ्या प्रमाणात ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. तर हे मंदिर प्राचीन आहे. त्यामुळे त्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी ठाणे जिल्हापरिषद आणि शासनाकडे मागणी केली असल्याची माहितीदेखील इथल्या ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या