Home /News /india-china /

सीमेवर चीनची प्रत्येक युक्ती होईल अपयशी! 7 लष्करी हवाई अड्ड्यांवर भारताची नजर

सीमेवर चीनची प्रत्येक युक्ती होईल अपयशी! 7 लष्करी हवाई अड्ड्यांवर भारताची नजर

LAC वर चीनच्या प्रत्येक हालचालींवर भारतीय सैन्यांचं लक्ष आहे

    नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : भारत आणि चीनच्या तणावादरम्यान (India-China Tension) विवाद कमी करण्यासाठी राजकीय स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र भारतीय सेना (India Army) च्या हालचालींमुळे चीन (China) इतका घाबरला आहे की त्याने एलएसी (LAC) वर पाळत वाढवली आहे. चीनच्या या निर्णयानंतर भारतीय एजंसीद्वारा पीपल्स लिबरेशन आर्मी ( Peoples Liberation Army) च्या वायु सेना (PLAAF) च्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. न्यूज एजेंसी ANI च्या रिपोर्टनुसार भारतीय एजंसीने शिनजियांग आणि तिबेट भागात चिनी वायुसेनाच्या होटन, गर गुनसा, काशघर, होपिंग, डोंक्का डोंग, लिन्झी आणि पंगत एअरबेसवर नजर ठेवून आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा एअरबेस गेल्या काही दिवसांत अधिक सक्रीय झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिनी सैन्याने गेल्या काही दिवसात अनेक भागांना अपग्रेड केलं आहे. या भागात जास्तीत जास्त लोकांना राहणे, रनवेच्या लांबीचा विस्तार आणि अन्य सुधार करण्यात आले आहे. सुत्रांनी सांगितले की पूर्वोत्तर राज्यांमध्ये लाइनज़ी एअरबेस मुख्य रूपात एक हेलीकॉप्टर बेस आहे आणि चीनने त्या भागात लक्ष वाढविण्याच्या हालचालींना वाढविण्यासाठी तेथे हेलीपॅडचं एक नेटवर्क उभं केलं आहे. यासह लढाऊ विमानांनी तैनात केलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये चिनी लष्कराचा अॅंफिबियस रणगाडा पाण्यात बुडताना दिसत आहे. असे म्हटले जात होते की, हा रणगाडा पाण्यात आणि जमिनीत अतिशय सक्षम आहे. मात्र या व्हिडीओमुळे चीनच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या amphibious टॅंकचे काम पाण्याच्या आत राहून प्रतीक्षा करणे आणि अचानक हल्ला करणे किंवा एखाद्या संशयास्पद वाहनास आवश्यक असल्यास नदी ओलांडण्यापासून थांबविणे असते. आता असा आरोप केला जात आहे की, ही टॅंक तयार करण्यासाठी निकृष्ठ दर्जाचे स्टील वापरण्यात आले आहे, त्यामुळे ते पाण्यात बुडाले.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या