पुण्यात भीषण अपघात! भरधाव कार पडली विहिरीत, आईसह दोन चिमुरड्यांचा करुण अंत

पुण्यात भीषण अपघात! भरधाव कार पडली विहिरीत, आईसह दोन चिमुरड्यांचा करुण अंत

भरधाव कार खोल विहिरीत पडून झालेल्या भीषण अपघातात आईसह दोन चिमुरड्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला

  • Share this:

पुणे, 10 जून: भरधाव कार खोल विहिरीत पडून झालेल्या भीषण अपघातात आईसह दोन चिमुरड्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील अष्टापूर येथे मंगळवारी मध्यरात्री हा अपघात झाला

हेही वाचा..तब्बल 8 दिवस हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये पडून होता कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह

मिळालेली माहिती अशी की, सचिन कोतवाल (रा.अष्टापूर) हे पत्नी आणि दोन मुलासह कारने प्रवास करीत होते. यावेळी त्यांचं भरधाव कारवरील नियंत्रण सुटून कार थेट विहीरीत पडली. अपघात अत्यंत भीषण होता. त्यात सचिन यांची पत्नी शितल कोतवाल, मुलगी सृष्टी आणि मुलगा शौर्य या तिघांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. तर सचिन कोतवाल यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरू आहेत.

दुसरीकडे, पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टीव्हीवर कार्टून बघण्यास आई आणि आजीनं विरोध केल्याने एका 14 वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मंगळवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. मुलगा सकाळपासून टीव्हीवर कार्टून बघत होता. त्यावरून त्याला आई आणि आजीने रागावलं. त्याला टीव्ही बंद करण्यास सांगितलं. मात्र त्यानं दोघींच ऐकलं नाही. तो पुन्हा टीव्हीवर कार्टून बघू लागला. तितक्यात बहिणीने त्याच्या हातातून रिमोट हिस्कावून टीव्ही बंद केला. याचा मुलाला राग आला. संतापात तो घराच्या वर राहणाऱ्या मामाच्या घरी गेला आणि तिथं त्यानं सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली.

हेही वाचा.. लग्नास नकार दिला म्हणून भाच्यानं मामाचीच मुलगी पळवली, लपवलं ऊसाच्या फडात

बराच वेळ झाला मुलगा कुठेच दिसत नाही म्हणून आई वर राहणाऱ्या भावाकडे गेली. खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता मुगला फासावर लटकलेला दिसला. मुलाला तातडीने खाली उतरवून खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: June 10, 2020, 2:39 PM IST

ताज्या बातम्या