Home /News /maharashtra /

संतापजनक! तब्बल 8 दिवस हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये पडून होता कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह

संतापजनक! तब्बल 8 दिवस हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये पडून होता कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह

जळगाव सिव्हिल हॉस्पिटलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

जळगाव, 10 जून: जळगाव सिव्हिल हॉस्पिटलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 2 जूनपासून बेपत्ता असलेली कोरोनाबाधित 82 वर्षीय वृद्ध महिला रुग्ण हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे तब्बल 8 दिवस हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये महिलेचा मृतदेह पडून होता. हेही वाचा.. लग्नास नकार दिला म्हणून भाच्यानं मामाचीच मुलगी पळवली, वाचा पुढे काय झालं ते... कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेली 82 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिला गेल्या 2 जूनपासून बेपत्ता होती. महिलेचा कोरोना रिपोर्ट  पॉझिटिव्ह आला होती. महिला रुग्ण बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिली होती. महिलेचा सर्वत्र शोध घेतला जात होता. मात्र, हॉस्पिटलच्या 7 नंबर वॉर्डमधील बाथरूममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. तब्बल 8 दिवस बाथरूममध्ये महिलेचा मृतदेह होता. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेवरून जळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या कोरोना उपचार यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मूळ भुसावळ येथे राहणारी ही महिला 1 जून रोजी त्रास होत असल्यामुळे तेथील रुग्णालयात दाखल झाली होती. दुसऱ्या दिवशी तिचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तिची जळगावच्या कोविड रुग्णालयात रवानगी केली होती. त्यानंतर 2 रोजी ही वृद्धा कोविड रुग्णालयातून बेपत्ता झाली. या घटनेनंतर यंत्रणा खडबडून जागी होऊन वृद्धेचा शोध सुरू केला होता. महिलेचा सर्वत्र शोध घेण्यात येत असताना तब्बल आठ दिवसांनंतर हॉस्पिटलच्या एका बाथरुममध्ये महिला मृतावस्थेत आढळून आली आहे. काय म्हणाले जिल्हाधिकारी? 2 जूनपासून बेपत्ता असलेली हीच ती वृद्ध महिला आहे. सिव्हिल हॉस्पिटलचा अत्यंत गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. सिव्हिलचे डॉक्टर्स, कर्मचारी याला घटनेला जबाबदार आहेत. या घटनेचा चौकशी अहवाल तत्काळ शासनाला पाठवणार असल्याचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी सांगितलं आहे. कोविड हॉस्पिटल म्हणून आवश्यक ती काळजी सिव्हिल प्रशासनानं घेतली नसल्याचंही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. हेही वाचा.. धक्कादायक, मनसेच्या नेत्याने हॉस्पिटलमधून कोरोना रुग्णाला पळवले मुंबईतही घडली होती अशीच घटना... केईएम रुग्णालायतून 75 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण सुधाकर खाडे काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते. त्यांच्या जावयाने रुग्णालयात संपर्क केला असता ते बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती.  याप्रकरणानंतर 15 दिवसांनी सुधाकर खाडे यांचा मृतदेह केईएम रुग्णालयाच्या शवागृहात सापडला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर केईएम रुग्णालयाच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus, Jalgaon

पुढील बातम्या