जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा, दाम्पत्याला धडक देऊन कार उलटली नाल्यात, दोघांचा जागीच मृत्यू

मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा, दाम्पत्याला धडक देऊन कार उलटली नाल्यात, दोघांचा जागीच मृत्यू

मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा, दाम्पत्याला धडक देऊन कार उलटली नाल्यात, दोघांचा जागीच मृत्यू

नागपूर-चंद्रपुर मार्गावरील मजरा इथं ही घटना असून चालक फरार झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंद्रपूर, 05 ऑगस्ट : मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडलेल्या पती-पत्नी भरधाव कारची धडक बसून दोघेही जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पती-पत्नीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागपूर-चंद्रपुर मार्गावरील मजरा इथं ही घटना आहे. हरेंद्र सिंह (58) आणि मीरा सिंह (52) अशी मृतकांची नावं आहेत.  हरेंद्र सिंह हे voltas कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. मजरा येथील रहिवासी असलेल्या दोघांचे मृतदेह वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दिनो मोर्याने नारायण राणेंना ठरवलं खोटं, केला महत्त्वाचा खुलासा आज सकाळी हरेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी मीरा हे दोघे जण नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. वरोरा शहरालगत पोहोचले असता भरधाव वेगात येणाऱ्या टाटाच्या गाडीने दोघांना जोरात धडक दिली. कारचा वेग जास्त होता. सिंह दाम्पत्याला धडक दिल्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात जाऊन उलटली. कारच्या धडकेत सिंह दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, सिंह दाम्पत्य हे जखमी अवस्थेत रस्त्यावर विव्हळत होते. तेव्हा चालकाने मदत करण्याचे सोडून घटनास्थळावरून पळ काढला. सकाळच्या वेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्यामुळे सिंह दाम्पत्याला वेळेवर मदत मिळू शकली नाही, त्यामुळे त्यांनी घटनास्थळावरच प्राण सोडले. राममंदिर भूमिपूजन: पिंपरी-चिंचवडमध्ये वाटणार 10 लाख लाडू; भाजप आमदारांना नोटीस घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. या घटनेतील वाहन चालक फरार असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात