मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राममंदिर भूमिपूजन: पिंपरी-चिंचवडमध्ये वाटणार 10 लाख लाडू; भाजप आमदारांना नोटीस

राममंदिर भूमिपूजन: पिंपरी-चिंचवडमध्ये वाटणार 10 लाख लाडू; भाजप आमदारांना नोटीस

आमदार महेश लांडगे यांच्या हालचालींवर पोलिसांचं बारीक लक्ष

आमदार महेश लांडगे यांच्या हालचालींवर पोलिसांचं बारीक लक्ष

आमदार महेश लांडगे यांच्या हालचालींवर पोलिसांचं बारीक लक्ष

पिंपरी चिंचवड, 5 ऑगस्ट: ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी उत्तर प्रदेशात अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या पार्श्वभूमीवर जिथे आहे तिथून हा ऐतिहासिक क्षण पाहावा, असं आवाहान भाजपनं केलं आहे. दुसरीकडे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये 10 लाख लाडू वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मात्र, पोलिसांनी यावर आक्षेप घेतला असून आमदार लांडगे यांना कायदेशिर नोटीसही बजावली आहे. हेही वाचा...Ram mandir bhumi pujan: अमेरिकेच्या राजधानीत भक्तांकडून 'प्रभू श्रीराम'चा जयघोष विशेष म्हणजे, आज श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळा अयोध्येत होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलीस प्रशासनाने महाराष्ट्रातील भाजपच्या आमदारांमध्ये पहिली नोटीस भोसरीचे आमदार आणि पिंपरी- चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांना बजावली आहे. तसेच आमदार लांडगे यांच्या हालचालींवर पोलिसांच बारीक लक्ष आहे. आमदार महेश लांडगेंकडून 10 लाख लाडू श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त ‘जय श्रीराम’चा नारा रामजन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा समारंभ होत आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने तब्बल 10 लाख मोतीचूर लाडू वाटप करणार असून पिंपरी-चिंचवडमधील सुमारे 40 प्रमुख चौकात लाडू वाटप करण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, लाडू वाटपाचा कार्यक्रम घेऊ नये. त्यामुळे कायदा व्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि तस झाल्यास त्याची सर्व जबाबदारी आपल्यावर असेल, हे लक्षात घेऊन कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. मात्र, इंद्रायणीनगर येथील येथे मोठ्या हॉलमध्ये दोन दिवसांपासून लाडू तयार करण्याची लगबग सुरू आहे. त्यासाठी एका मोठ्या हॉलमध्ये व्यवस्था केली आहे. लाडू बनवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कारागिरांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करूनच लाडू तयार करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या उपक्रमासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याच सांगत सध्या तरी नोटीसीनंतर पुढील भूमिका काय असेल हे अद्याप आमदार लांडगे यांनी स्पष्ट केलेलं नाही. हेही वाचा...अयोध्येजवळ उभारली जातेय प्रभू रामाची जगातली सर्वात उंच मूर्ती! दरम्यान, पिंपरी चिंचवडमधील विश्वहिंदू परिषद, बजरंग दल, विश्व श्री राम सेना आणि इतरही हिंदुत्ववादी संघटना, कार्यकर्त्यांना नोटिसा बजविण्यात आल्या असून रात्री 12 नंतर पोलीस चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने शहरात जमाव बंदीचा आदेश लागू आहे. त्याच बरोबरराम मंदिर भूमी पूजनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक उत्सव साजरा करू नका, आक्षेपार्ह वर्तन, घोषणाबाजी, पोस्टरबाजी केल्यास आणि सार्वजनिक ठिकाणी धार्मिक सभा समारंभ घेतल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा ,पिंपरी चिंचवड पोलिसांनी नोटीसीद्वारे दिला आहे.
First published:

Tags: Ayodhya ram mandir, Pune news, Ram mandir and babri masjid, Ram mandir ayodhya

पुढील बातम्या