मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Breaking: SSR प्रकरणात मुंबईत आलेली CBI टीम दिल्लीला रवाना, होणार महत्त्वाची बैठक

Breaking: SSR प्रकरणात मुंबईत आलेली CBI टीम दिल्लीला रवाना, होणार महत्त्वाची बैठक

20 सप्टेंबरला मेडिकल बोर्डची ही बैठक दिल्लीमध्ये पार पडेल.

20 सप्टेंबरला मेडिकल बोर्डची ही बैठक दिल्लीमध्ये पार पडेल.

20 सप्टेंबरला मेडिकल बोर्डची ही बैठक दिल्लीमध्ये पार पडेल.

  • Published by:  Renuka Dhaybar

मुंबई, 17 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) च्या प्रकरणात तपास करण्यासाठी मुंबईत आलेली CBI पुन्हा दिल्लीला गेली असल्याची महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सुशांत सिंह राजपुत प्रकरणात मेडिकल बोर्डाची महत्वपूर्ण बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 20 सप्टेंबरला मेडिकल बोर्डची ही बैठक दिल्लीमध्ये पार पडेल.

मिळालेल्या माहितीनुसार, मेडिकल बोर्डाचे प्रमुख डॉ सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वात ही बैठक पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासंबंधी CBIच्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CBI च्या SIT टीमच्या तपासणी अहवालावर मेडिकल टीम चर्चा करणार आहे. त्यामुळे यातून काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

चीनने पुन्हा एकदा रचला मोठा कट, मोदींपासून ते संपादकांपर्यंत सगळ्यांवर हेरगिरी

दरम्यान, मंडळाचे सदस्य केंद्रीय सदस्य फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळांच्या फाइंडिंग रिपोर्टचा अभ्यासही करणार आहेत. या दोन्ही अहवालांचा अभ्यास केल्यानंतर वैद्यकीय मंडळ यावर शेवटचा निर्णय देणार आहे. या बैछकीमध्ये अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे आहे.

दरम्यान, सीबीआयच्या नुकत्याच झालेल्या चौकशीत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) कुटुंबाने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने (rhea chakraborty) सुशांतचे 15 कोटी रुपये लुटल्याचा आरोप केला होता. मात्र रियाच्या बँक खात्यात असा कोणताही व्यवहार सापडला नाही. मग सुशांतच्या वडिलांनी 15 कोटींचा हा आरोप केला होता, इतकी मोठी रक्कम मग नेमकी गेली कुठे असा प्रश्न उपस्थित होतो आहे. दरम्यान याबाबत आता सीबीआयला धागादोरा सापडला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पोलिसांनी कारवाई केल्याचा गुंडांनी घेतला भयंकर बदला, चाकूने केले सपासप वार

सुशांतच्या कुटुंबाने सुशांतच्या ज्या 15 कोटी रुपयांबाबत तक्रार केली, ते पैसे सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीच्या वडिलांच्या कंपनीत गुंतवले असल्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे. श्रुतीच्या वडीलांची गार्मेंटची मोठी कंपनी आहे. याप्रकरणी आता लवकरच तपास होणार आहे.

दरम्यान रिया चक्रवर्ती आणि श्रुती मोदी एकमेकींना आधीपासूनच ओळखत होत्या, अशी माहितीदेखील समोर येत आहे. श्रुती ही रियाची लहानपणीची मैत्रीण आहे आणि सुशांतवर दबाव टाकून रियाने तिला सुशांतची मॅनेजर बनवलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

First published:

Tags: Bollywood, Kangana ranaut, Sushant sing rajput, Sushant Singh Rajput