मुंबई, 1 मे : नेहमीच काहीतरी हटके करणाऱ्या 'भाडिपा' या YouTube चॅनेलनंही आज महाराष्ट्र दिनानिमित्त 'जय महाराष्ट्र' या हटके गाण्याची भेट त्यांच्या प्रेक्षकांना दिली आहे. या गाण्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं चित्रण करण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर या गाणं सोशल मीडियावर ट्रेंड करतंय. विशेष म्हणजे शाहीर अमर शेख यांचे शब्द असलेलं हे गाणं नव्या स्वरूपात सादर होत आहे आणि त्यात भाडिपचे आणि मराठी नाट्य-चित्रसृष्टीतले अनेक कलाकार गाताना दिसत आहेत.
भाडिपानं सादर केललं 'जय महाराष्ट्र' हे गाणं प्रसिद्ध शाहीर अमर शेख यांनी लिहीलं असून हे गाणं, सोहम पाठक, पल्लवी परांजपे, सागर देशमुख, पॉला मॅक्लिनिन, अभय महाजन, अलोक राजवाडे, पर्ण पेठे, जेडी(Beat boxer), निखिल राणे(Award wining Whistler) यांच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याचं दिग्दर्शन अभय राऊत यांनी केलं आहे. सध्या या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांकडून गाण्याचं कौतुक होताना दिसत आहे.
'भाडिपा' हे सर्वाधिक लोकप्रिय असं YouTube चॅनेल असून त्यांचे जवळपास 4 लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत. फक्त भारतातच नाही तर आता परदेशातही या चॅनेलला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
VIDEO: दीपिका पदुकोणचा 'बास्केटबॉल' मीडियावर व्हायरल; 'अशी' होती रणवीरची प्रतिक्रिया
फत्तेशिकस्तमधून दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं भारतातलं पहिलं सर्जिकल स्ट्राइक