Birthday Special: लिप सर्जरीमुळे ट्रोल झाली होती अनुष्का शर्मा, नेटीझन्स म्हणाले...

या लिप सर्जरीमुळे अनुष्काला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 09:17 AM IST

Birthday Special: लिप सर्जरीमुळे ट्रोल झाली होती अनुष्का शर्मा, नेटीझन्स म्हणाले...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहमीच तिचे सिनेमा आणि पती विराट कोहलीसोबत रोमँटिक फोटो शेअर केल्यानं चर्चेत असणाऱ्या अनुष्काला याआधी अनेक कारणांनी ट्रोल केलं गेलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहमीच सिनेमा आणि पती विराट कोहलीसोबत रोमँटिक फोटो शेअर केल्यानं चर्चेत असणाऱ्या अनुष्काला याआधी अनेक कारणांनी ट्रोल केलं गेलं आहे.

2010मध्ये आलेल्या 'बँड बाजा बारात' या सिनेमातून अनुष्कानं बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या सिनेमात ती रणवीर सिंहसोबत दिसली होती. तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.

2010मध्ये आलेल्या 'बँड बाजा बारात' या सिनेमातून अनुष्कानं बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या सिनेमात ती रणवीर सिंहसोबत दिसली होती. तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.

मात्र या सिनेमानंतर अनुष्का आणि रणवीरच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवूडमध्ये सुरु झाल्या होत्या. मात्र या दोघांनीही आपल्या नात्याची जाहीर कबूली दिली नाही. काही काळातच त्यांच्यातील मतभेद वाढले आणि त्यांनी एकमेकांपासून दूर होणं पसंत केलं.

मात्र या सिनेमानंतर अनुष्का आणि रणवीरच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवूडमध्ये सुरु झाल्या होत्या. मात्र या दोघांनीही कधीच आपल्या नात्याची जाहीर कबूली दिली नाही. काही काळातच त्यांच्यातील मतभेद वाढले आणि त्यांनी एकमेकांपासून दूर होणं पसंत केलं.

त्यानंतर अऩुष्का शर्मा चर्चेत आली ती तिनं केलेल्या लिप सर्जरीमुळे. 2014मध्ये आलेल्या 'पीके' सिनेमात अनुष्का हटके अंदाजात दिसली होती. त्यावेळी तिनं या सिनेमाच्या लुकसाठी लिप सर्जरी केली होती.

त्यानंतर अनुष्का शर्मा चर्चेत आली ती तिनं केलेल्या लिप सर्जरीमुळे. 2014मध्ये आलेल्या 'पीके' सिनेमात अनुष्का हटके अंदाजात दिसली होती. त्यावेळी तिनं या सिनेमाच्या लुकसाठी लिप सर्जरी केली होती.

मात्र तिचा हा लुक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला नाही उलट या लिप सर्जरीमुळे अनुष्काला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. तिची तुलना नेटीझन्सनी बदकाशी केली होती.

मात्र तिचा हा लुक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला नाही उलट या लिप सर्जरीमुळे अनुष्काला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. तिची तुलना नेटीझन्सनी बदकाशी केली होती.

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर अनुष्कानं पुन्हा एकदा लिप सर्जरी केल्याचं बोललं गेलं मात्र यावर स्वतः अनुष्कानं कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं.

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर अनुष्कानं पुन्हा एकदा लिप सर्जरी केल्याचं बोललं गेलं मात्र यावर स्वतः अनुष्कानं कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं.

अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नसताना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनुष्कानं आपल्या मेहनतीनं या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर 2017मध्ये ती भारतीय क्रिकेट संघांचा कर्णधार विराट कोहलीहीशी विवाह बंधनात अडकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2019 09:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close