मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात पेटणार ठिणगी, उदयनराजेंच्या अध्यक्षतेखाली 2 दिवसांत मोठा निर्णय

मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात पेटणार ठिणगी, उदयनराजेंच्या अध्यक्षतेखाली 2 दिवसांत मोठा निर्णय

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला जाणार आहे. यासाठी साताऱ्याची निवड करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला जाणार आहे. यासाठी साताऱ्याची निवड करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला जाणार आहे. यासाठी साताऱ्याची निवड करण्यात आली आहे.

सातारा, 07 ऑक्टोबर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी पहिली ठिणगी ही साताऱ्यात पडणार आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दोन महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढा देण्यासाठी तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला आता दिशा देण्यासाठी मराठा समाज आंदोलकांनी मोठे पाऊल उचलले आहे.

शोपियामध्ये मोठी चकमक, सुरक्षा दलाकडून टॉप कमांडरसह 3 दहशतवादी ठार

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला जाणार आहे. यासाठी साताऱ्याची निवड करण्यात आली आहे. भाजपचे राज्यसभेचे  खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात राज्यव्यापी बैठक दोन दिवसात पार पडणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण कसे मिळवता येईल, सरकारवर कशा पद्धतीने दबाव टाकता येईल, या वेगवेगळ्या मुद्यांवर  या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत राज्यात मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. उदयनराजे मराठा आरक्षणासाठी काय भूमिका मांडता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ऑक्टोबरमध्ये आली GOOD NEWS! 7 दिवसात पॉझिटिव्हिटी रेट घटला

दरम्यान, मध्यंतरी उदयनराजे भोसले यांनी सरकारवर घणाघाती टीका करत इशारा दिला होता. 'मी सरकारला जाहीर आवाहन करतो. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. कारण मराठा समाज आता एकटा नाही एवढच सांगतो,' असा आक्रमक इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता.

10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात पुन्हा राजकारण वातावरण तापले आहे. सरकारवर दबाव आण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीने 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

मराठा समाजाला EWS चे आरक्षण नको, संभाजीराजेंची मागणी

तर, मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणात मराठ्यांचा समावेश करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत होता. मात्र, असं केल्यास कोर्टात असणाऱ्या आरक्षणाला धक्का बसू शकतो, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा समाजातील नेत्यांनी घेतली.

First published:

Tags: Udayan raje bhosle