नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : देशातील कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांसंबंधी एक चांगली बातमी येत आहे. गेल्या काही दिवसांतील आकडे पाहिल्यास, देशातील नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर, दुसरीकडे देशाचा पॉझिटिव्हिटी रेट घटला आहे. सध्या देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 6.8 टक्के झाला आहे. कोरोना रुग्णांमध्ये 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान ही घट झालेली पाहायला मिळाली. याशिवाय एका आठवड्यात देशात तब्बल 80 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या. एका रिपोर्टनुसार, 2 ते 8 सप्टेंबरदरम्यान, देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 8.3 टक्के होता. 16 से 22 सप्टेंबरदरम्यान हाच आकडा 9.2 टक्के झाला. त्यानंतर पॉझिटिव्हिटी रेट वाढताना दिसला. मात्र गेल्या 3 आठवड्यांपासून देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 6.8 टक्के आहे. केंद्र सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या मते, देशात आतापर्यंत सुमारे 8 कोटी 80 लाख कोरोनाव्हायरस सॅंपलची चाचणी करण्याती आली आहे. वाचा- मास्क आणि लशींना विरोध; भारतातील Anti-Mask Movement चं काय आहे कारण गेल्या आठवड्यात सर्वात जास्त लोक रिकव्हर झाले. गेल्या दोन आठवड्यांत देशातील कोरोनाव्हायरस केस होल्डही 10 लाखांपेक्षा कमी आहे. तरी, थंडी व सणासुदीच्या दिवसात लोकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहानत राजेश भूषण यांनी केले आहे. वाचा- मोदी सरकारनं आणलं AYUSH 64; कोरोना रुग्णांसाठी प्रभावी आयुर्वेदिक औषध मंगळवारी नवीन रुग्णांपेक्षा निरोगी रुग्ण जास्त मंगळवारी 61 हजार 267 नवे रुग्ण सापडले तर, 884 लोकांचा मृत्यू झाला. सलग तिसऱ्या दिवशी मृतांचा आकडा कमी झाला आहे. आतापर्यंत देशात 1 लाख 3 हजार 569 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 75 हजार 675 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह एकूण 56 लाख 62 हजार 491 लोकं आतापर्यंत निरोगी झाली आहेत. गेल्या 26 दिवसांपासून भारताचा अॅक्टिव्ह रेटमध्ये घट झाली आहे. 10.17 लाखवरून आता सध्या देशात 9.19 लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आकडे पाहिल्यास गेल्या एका महिन्यात 4 सप्टेंबरपासून ते 4 ऑक्टोबरपर्यंत 28.77 लाख नवे रुग्ण वाढले. तर, 27.91 रुग्ण निरोगी झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.