जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / लॉकडाउन नियमांचा फज्जा, रेल्वे कर्मचारी जीव धोक्यात घालून करताय काम!

लॉकडाउन नियमांचा फज्जा, रेल्वे कर्मचारी जीव धोक्यात घालून करताय काम!

लॉकडाउन नियमांचा फज्जा, रेल्वे कर्मचारी जीव धोक्यात घालून करताय काम!

शिवाय केंद्र शासनाच्या नियमांचे देखील उल्लंघन करीत असल्याने या प्रकरणी काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मनमाड, 15 एप्रिल : एकीकडे देशाला कोरोनाचा विळख्यातून वाचविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करीत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. विमान सेवेसह रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे.  दुसरीकडे मात्र, रेल्वचे अधिकारीच लॉकडाउनचा  फज्जा उडवीत असल्याचा धक्कादायक प्रकार मनमाडमध्ये आला आहे. मनमाडमधील रेल्वेच्या रापली गेटवर समोर सुमारे 25 ते 30 कर्मचारी एकत्रितपणे येऊन कोणतेही सोशल डिस्टसिंग न पाळता रेल्वे रुळावर काम करीत असल्याचा व्हिडिओ हाती लागला आहे. मनमाडपासून रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर रापली गेटच्या रेल्वे रुळावर पिडब्ल्यूआय या विभागाचे सेक्शन इंजिनियर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काम केले जात आहे. लॉकडाउनच्या काळात सर्व उद्योग धंदे बंद असून एखाद्या दुकानात 3-4 नागरिक जरी दिसले तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. हेही वाचा -  वांद्रे गर्दी प्रकरणावरून भाजपच्या नेत्याने केला नवा दावा, व्हिडिओ केला प्रसिद्ध या ठिकाणी तर रेल्वेचा अधिकारी सर्व नियम मोडीत काढून मनमानी पद्धतीने काम करत आहे. तसंच 25 ते 30 कामगारांचा जीवही धोक्यात घालत आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी आरोग्य प्रशासनाने दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी तीन फुटांचे अंतर असावे अशी नियमावली प्रसिद्ध केली आहे. परंतु, मनमाडमध्ये रेल्वेचे कर्मचारी या नियमांना धाब्यावर ठेवून काम करत आहे. हेही वाचा -  धक्कादायक! चीनच्या पावलावर पाऊल टाकतोय ‘हा’ देश, 6 हजार मृतांची माहिती लपवली शिवाय केंद्र शासनाच्या नियमांचे देखील उल्लंघन करीत असल्याने या प्रकरणी काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले. विशेष म्हणजे, लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्व रेल्वे गाड्या, एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्या रद्द केल्या आहे. फक्त मालगाडी रेल्वेसेवा सुरू राहणार आहे, असं स्पष्ट केलं आहे. संपादन -सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: manmad
  • First Published :
जाहिरात
जाहिरात