वांद्रे गर्दी प्रकरणावरून आता भाजपच्या नेत्याने केला नवा दावा, व्हिडिओ केला प्रसिद्ध

वांद्रे गर्दी प्रकरणावरून आता भाजपच्या नेत्याने केला नवा दावा, व्हिडिओ केला प्रसिद्ध

या घटनेच्या आधीचा एक व्हिडिओ किरीट सोमय्या यांनी राज्य सरकार आणि पोलिसांना दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : मुंबईतील वांद्रे स्टेशनच्या परिसरात परप्रांतीय तरुणांनी गर्दी प्रकरणाला वेगवेगळी वळण मिळत आहे. या प्रकरणी विनय दुबे नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून भाजपवर टीका केली होती. त्यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वेगळाचा दावा केला आहे.

मंगळवारी वांद्रे येथे हजारो लोकं जमली होती हा एक कट होता, असा दावा भाजप नेते किरीट सोमाय्या यांनी केला आहे. या घटनेच्या आधीचा एक व्हिडिओ किरीट सोमय्या यांनी राज्य सरकार आणि पोलिसांना दिला आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण हे घरी जाण्यासाठी इथं जमलो असल्याचं सांगत आहे.

तसंच, ज्या तरुणाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, तो तिथे जमलेल्या तरुणांना 'घरी जाऊ द्या किंवा 15 हजार रुपये द्या', असं बोलण्यास सांगत आहे. हा व्हिडिओ किरीट सोमय्यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे.

हेही वाचा - दहशतवाद्यांनाही कोरोना, पाकने उपचारास नकार दिल्याने अतिरेकी भारतात करणार प्रवेश?

वांद्रे स्टेशन बाहेर जमलेली ती लोकं स्थानिकच होती आजूबाजूच्या शास्त्रीनगर वसाहतीमधील होती. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री विनय दुबे नावाच्या तरुणाला अटक केली आहे. या तरुणाला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून चौकशी सुरू आहे.

लॉकडाऊनमध्ये वांद्र्यातील गर्दीमागे मोठं षड्यंत्र?

दरम्यान, वांद्रे इथे घडलेला प्रकार धक्कादायक होताच पण त्यामागे खूप मोठं षड्यंत्र असल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आपण जर नीट पाहिलं तर तिथे जमलेल्या मजूरांच्या हातात कोणत्याही प्रकारच्या बॅगा, सामान काहीच नव्हतं. फक्त मजूर आपल्या गावी जाण्यासाठी जमले होते असं सांगितलं जात होतं. मात्र, या संपूर्ण प्रकरामागे खूप मोठं कनेक्शन आणि षड्यंत्र असल्याची चर्चा होत आहे.

हेही वाचा - Coronavirus नाश करणारे डिसइन्फेक्शन टनेल माणसांसाठी घातक

लॉकडाऊन वाढल्यामुळे घरी जाण्यासाठी अनेक मजूर वांद्रे इथल्या बसस्थानकात मंगळवारी एकत्र आले होते. त्यांच्यासाठी 150 बस तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या गाड्यांच्या मदतीनं ते मुंबईतून बिहार आणि उत्तर प्रदेशात आपल्या गावी जाणार होते. मात्र, गावी जाण्यासाठी निघालेल्या मजुरांच्या हातात मात्र कोणतंही सामान नव्हतं. याचा अर्थ सरळ होता की या सर्व मजुरांना मुद्दाम भडकवून वांद्रे इथे जमण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मजुरांच्या भावनांचा उद्रेक होईल किंवा तिथे वाद निर्माण होतील अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. त्यामध्ये उत्तर भारतीय पंचायत महासभेचा विनय दुबे याचाही हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विनय दुबे या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

 

राजकारण करू नका, पवारांची विनंती

'वांद्रे इथं कुणी तरी रेल्वे सुरू झाल्याची अफवा पसरवली आणि त्यामुळे हजारो लोकं तिथे जमा झाले होते. प्रामुख्याने आपण डिस्टसिंगच्या सुचना केल्या आहे, त्याचं पालन केलं गेलं नाही. कुणीही अशा अफवा पसरवू नये, वांद्रे इथं जे घडलं ते पुन्हा घडू नये, याची खबरदारी घेतली पाहिजे', असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा - Coronavirus पासून बचावासाठी महत्त्वाचं सोशल डिस्टेसिंग; किती असावं सुरक्षित अंतर

'राजकीय संघर्ष हा आपण नेहमी करत असतो. त्यात आपण काही वेगळं करत नाही. पण, देशावर सध्या मोठं संकट आलं आहे. म्हणून केंद्रात कुणाचे सरकार आहे, राज्यात कुणाचे सरकार आहे याचा विचार करण्यापेक्षा एकत्र राहून मदत करणे गरजेचं आहे. राज्याला येणाऱ्या काळात काही अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. या काळात सर्वच जण एकत्र येऊन मदत करणे अपेक्षित आहे. पण, अशा परिस्थितीत राजकारण कुणीही करू नये, असं सांगत त्यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला.

संपादन - सचिन साळवे

First published: April 15, 2020, 1:40 PM IST

ताज्या बातम्या