टेक्सास, 05 जानेवारी : प्रपोज केल्यानंतर पाच दिवसांनी एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला गोळी घालून ठार मारल्याचा प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण अमेरिकेच्या टेक्सासमधील आहे. पोलिसांनी 39 वर्षीय आरोपी केन्ड्रिक अकिन्सला ताब्यात घेतले आहे. गर्लफ्रेंडची हत्या करण्याच्या अवघ्या 5 दिवस आधी दोघे प्रेमाच्या बंधनात अडकले होते. पण त्यानंतर असं काही झालं की बॉयफ्रेंडने प्रेयसीला गोळ्या घालून तिची हत्या केली.
पोलिसांनी सांगितले की, शनिवारी रात्री तरूणाने 33 वर्षीय गर्लफ्रेंड डोमिनिक जेफरसनला गोळ्या घातल्या. यावेळी त्यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला होता आणि त्याच रागात तरुणाने तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मृत मुलीच्या अपार्टमेंटपासून थोड्या अंतरावर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. नवीन वर्षाच्या एक दिवस आधी, केंड्रिकने डोमिनिकला प्रपोज केला होता, जो तिने स्वीकारला होता.
इतर बातम्या - प्रेमासाठी तरुणाने बदलले लिंग, तरुणी झाल्यानंतर त्रास असह्य; केली आत्महत्या
माध्यमांच्या वृत्तानुसार, घटनेदरम्यान आजूबाजूच्या लोकांनी आवाज ऐकला आणि त्या महिलेला मदत करण्यासाठीही बाहेर आले. पण शेजार्याने महिलेची सुटका करेपर्यंत तिला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आरोपी तरूण पळून गेला. जखमी तरुणीला तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
इतर बातम्या - दारूच्या नशेत पोलीस अधिकारी झिंगला, थेट मुख्यमंत्र्यांना दिली धमकी
पोलिसांनी सांगितले की, आरोपी आरोपीने शेजाऱ्यावरही गोळीबार केला, परंतु ते थोडक्यात वाचले. घटनास्थळाजवळ पोलिसांना एक कारही सापडली. कारचे दरवाजे खुले होते. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला पण नंतर त्याने स्वत: ला पोलिसांच्या स्वाधीन केले.
इतर बातम्या - पापणी लवताच पडला 100 फूटी उंच टॉवर, पाहा थरारक VIDEO
Published by:Renuka Dhaybar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.