Home /News /news /

प्रेम विवाहासाठी तरुणाने बदलले लिंग, तरुणी झाल्यानंतर त्रास असह्य; घेतले टोकाचे पाऊल

प्रेम विवाहासाठी तरुणाने बदलले लिंग, तरुणी झाल्यानंतर त्रास असह्य; घेतले टोकाचे पाऊल

आठ वर्ष लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होते. 4 महिन्यांपूर्वी पलकने लिंग बदल केले होते. पण त्यानंतर तिला अनेक शारीरिक त्रास सुरू झाला.

    इंदूर, 05 जानेवारी : लिंगबदल केल्यानंतर युवती झालेल्या तरुणीने डिप्रेशनमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे संपूर्ण प्रकरण चंदन नगर क्षेत्राच्या शुभम अपार्टमेंटमधील आहे. इथे राहणाऱ्या एका रोहित नामक युवकाने पलक नावाच्या एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता. पलक आधी पुरुष होती. तिचं नाव हरीश होतं. पण लिंगबदल केल्यानंतर आयुष्यात असे काही बदल झाले की पलकने आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्ष लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होते. 4 महिन्यांपूर्वी पलकने लिंग बदल केले होते. पण त्यानंतर तिला अनेक शारीरिक त्रास सुरू झाला. लिंग बदल केल्यामुळे तिला युरिनचा त्रास होण्यास सुरुवात झाली. या सगळ्या पलक कंटाळली होती. तिला शारीरिक वेदना सहन होत नव्हत्या. त्यामुळे नैराश्यातून पलकने फाशी लावून आत्महत्या केली. पलकच्या अशा जाण्यामुळे इंदूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलिसांत नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून पलकचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मुंबईत SEX रॅकेटचा पर्दाफाश, हे आहेत महत्त्वाचे अड्डे मुंबई शहरात बांगलादेश आणि पश्चिम बंगाल मधून मुलींना आणून त्यांना वेश्या व्यवसायात टाकून आर्थिक फायदा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसच्या गुन्हे शाखे तर्फे करण्यात आलाय. मात्र ह्या रॅकेट मागे कोण कोण आहेत ह्याचा शोध सुरू आहे. मुंबई हे अंतरराष्ट्रीय दर्जेचा शहर असला तरी मात्र ह्या शहरात अनधिकृत कामं सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा अनेक वेळा समोर आलेलं आहे. असाच एक प्रकार समोर आहे ज्यामध्ये दलालांमार्फत भारतात पश्चिम बंगाल आणि बांगलादेश ह्या देशातून मुलींना मुंबईत आणून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलला जात असल्याचा समोर आलं आहे. गुन्हे शाखे तर्फे दहिसरच्या गिरी निवास रावळपाडा दहिसर पूर्व मधून तीन मुलींची सुटका करण्यात आली असून संजय गोविंदास नावाच्या एका दलालाला अटक करण्यात आलीय. तो या सर्व प्रकाराचा सूत्रधार होता. ह्या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळाली होती की दहिसरच्या रावळपाडा मध्ये मानवी तस्करीचं रॅकेट आहे. पोलिसांनी जेव्हा घटनास्थळी धाड टाकली तेव्हा त्यांना तिथे तीन मुली आढळून आल्यात. त्यात एक तरुणी ही पश्चिम बंगालची असल्याचं आढळून आलंय. पार्टीतून कारने घरी निघाली महिला, ड्रायव्हरने तिच्याच फ्लॅटमध्ये केला बलात्कार तर दुसरी मुलगी ही बांगला देशाची नागरीक असल्याचं निष्पन्न झालं. तिच्याकडे बांगलादेशचा पासपोर्ट आणि व्हिसा मिळून आलाय. ह्या सर्व मुलीकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचं सष्ट झालंय. हा सर्व प्रकार परदेशी मुलींची तस्करी आणि वेश्या व्यवसायाशी निगडित असल्याने नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई सुरू आहे आरोपी दलालाला अटक करून ह्या रॅकेट मध्ये इतर कोण कोण आहे ह्याचा शोध सध्या गुन्हे शाखे मार्फत सुरू आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या