मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Makar sankranti haldi kumkum : हळदी कुंकवासाठी टॉपक्लास दिसयाचंय तेही कमी वेळत, मग फॉलो करा या सुपरक्लास टिप्स!

Makar sankranti haldi kumkum : हळदी कुंकवासाठी टॉपक्लास दिसयाचंय तेही कमी वेळत, मग फॉलो करा या सुपरक्लास टिप्स!

सण समारंभ आले म्हटलं की हळदी कुंकवाचे कार्यक्रम हे आलेच. अशातच संक्रात आली आहे.  मग काय सगळ्या जणी एकाच गोष्टीला महत्त्व देतात ते म्हणजे कमी वेळेत कसं सुंदर दिसायचे. मग वाट कसली पाहाताय या (Haldi kumkum Styling Tips) टिप्स फॉलो केल्यानंतर टॉपक्लास तर दिसणारच आणि सगळीकडे तुमच्या सुपर क्लास लुकची चर्चा होणार.

सण समारंभ आले म्हटलं की हळदी कुंकवाचे कार्यक्रम हे आलेच. अशातच संक्रात आली आहे. मग काय सगळ्या जणी एकाच गोष्टीला महत्त्व देतात ते म्हणजे कमी वेळेत कसं सुंदर दिसायचे. मग वाट कसली पाहाताय या (Haldi kumkum Styling Tips) टिप्स फॉलो केल्यानंतर टॉपक्लास तर दिसणारच आणि सगळीकडे तुमच्या सुपर क्लास लुकची चर्चा होणार.

सण समारंभ आले म्हटलं की हळदी कुंकवाचे कार्यक्रम हे आलेच. अशातच संक्रात आली आहे. मग काय सगळ्या जणी एकाच गोष्टीला महत्त्व देतात ते म्हणजे कमी वेळेत कसं सुंदर दिसायचे. मग वाट कसली पाहाताय या (Haldi kumkum Styling Tips) टिप्स फॉलो केल्यानंतर टॉपक्लास तर दिसणारच आणि सगळीकडे तुमच्या सुपर क्लास लुकची चर्चा होणार.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 14 जानेवारी- सण समारंभ आले म्हटलं की हळदी कुंकवाचे कार्यक्रम हे आलेच. अशातच संक्रात आली आहे. मग काय महिला वर्गाची सक्रांतीच्या (Makar Sankranti) हळदी कुंकवासाठी टॉपक्लास दिसायची स्पर्धातच लागते. पण या धावत्या जगात वेळ असतोच कुठे. मग काय सगळ्या जणी एकाच गोष्टीला महत्त्व देतात ते म्हणजे कमी वेळेत कसं सुंदर दिसायचे. मग वाट कसली पाहाताय या (Haldi kumkum Styling Tips) टिप्स फॉलो केल्यानंतर टॉपक्लास तर दिसणारच आणि सगळीकडे तुमच्या सुपर क्लास लुकची चर्चा होणार.

टिप नंबर 1- साडी कशी निवडायची ?

हळदी कुंकवाला जायचे आहे मग आयत्यावेळी गोंधळ उडू नये म्हणून तुम्ही कोणती साडी किंवा ड्रेस घालणार आहात त्या आधी एखा साईडला काढून ठेवा. कार्यक्रम रात्री आहे किंवा दिवसा त्यानुसार काटाच्या साड्या असतील किंवा वर्कच्या साड्यांची निवड करा. यावेळी रंगसंगती लक्षात घ्या. सध्या मार्केटमध्ये म्हणा किंवा महिला वर्गात खणांच्या साड्यांचा ट्रेंड सुरू आहे. त्यानुसार देखील तुम्ही साडी निवडू शकात. त्यामुळे तुमचा गोंधळ उडणार नाही.

टिप नंबर 2- ज्वेलरी कोणती निवडायची ?

भरजरी किंवा भरपदर काठाची किंवा सिल्कची साडी नेसणार असाल तर गोल्डन ज्वेलरी घालू शकता. वेगळा लुक ट्राय करणार असाल तर काटाच्या साडीवर तुम्ही काहीसी ऑक्सिडाईज ज्वेलरी ट्राय करू शकता. सगळीकडे ही ज्वेलरी ट्रेंडमध्ये आहे. शिवाय तुम्ही मोत्याचे दागिने घालणर असाल तर त्यासोबत मोत्याच्या बांगड्या, नथ घालायला विसरू नका. याशिवाय तुम्ही पारंपारिक ज्वेलरी देखील वापरू शकता.

वाचा-मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणारे मेसेज; Facebook, WhatsApp Status

टिप नंबर 3- साडीला काही पर्याय आहे का?

बऱ्याच महिला वर्गाला साडी नेसायला वेळ लागतो मग त्यांचा गोंधळ उडतो. अशावेळी साडीचे शिवलेले ड्रेस, वनपिस तुम्ही वापरू शकता. यावर देखील तुम्ही नथ तसेच गळ्यात एकादा चोकर घालू शकता. बाजारात देखील हे ड्रेस सहज उपल्बध होतात. त्यामुळे हे ड्रेस उत्तम पर्याय ठरतात. शिवाय तुम्ही खणाचे देखील वनपिस शिवून घेऊ शकात. यामुळे तुमचा वेळही वाचेल तुम्ही छानही दिसाल.

टिप नंबर 4- मेकअप कसा करायचा?

हळदी कुंकवाला जाताना उठून दिसण्यासाठी तुम्ही ब्राईट, सोबर कलर्स ट्राय करायला हवेत. जर तुमची साडी डार्क रंगाची असेल तर लिपस्टिक भडक लावू नका त्यामुळे तुम्ही जास्त मेकअप केलाय असं वाटू शकतं. डार्क शेडच्या साडीवर फिकट रंगाची लिपस्टिक निवडा. याऊलट जर तुमच्या साडीचा रंग लाईट असेल तर डार्क लिपस्टिकची निवड करू शकता. शिवाय तुम्ही इतर साहित्या देखील मेकअपसाठी वापरू शकता. यासाठी चेहऱ्याचा पोत लक्षात घ्या आणि त्यानुसार क्रीम, मेकअपबेस निवडा.

वाचा-Brain Stroke ला वेळीच ओळखा; ही लक्षणं दिसली की ताबडतोब गाठा हॉस्पिटल

टिप नंबर 5- हेअर स्टाईल कोणती करायची?

तुमच्या चेहऱ्याचा शेफ त्यानुसार तुम्हाला सुट होणारी हेअर स्टाईल निवडा. पारंपारिक साडीवर तुम्ही आंबाडा किंवा खोपा घालू शकता. तसेच केसांचा नुकताच हेअर कट करून घेतला असेल तर तुम्ही केस छान मोकळे ठेवू शकता. जर तुमचे केस जास्त पातळ दिसत असतील तर पुढच्या केसांवर पफ किंवा एका साईडला वेणी बांधून मागच्या केसांचा बन बांधा. बनभोवती तुम्ही फ्रेश गजरा गुंडाळू शकता किंवा अर्टिफिशिल फ्लॉवर्स, ब्रॉचसुद्धा लावू शकता.

टिप नंबर 6- साडीवर ब्लाऊज कसं निवडायचे ?

साडी म्हटलं की ब्लाऊज कसं निवडयाचे किंवा शिवायचे असा प्रश्न पडतो. सध्या साडीवर फुल बाही किंवा बलुन बाहीचा ट्रेंड आहे. त्यानुसार तुमची साडी कशी आहे त्यानुसार ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता. शिवाय तुम्ही तुमच्या कपाटात हिरव्या, लाला, गुलाबी, काळा व पांढरी तसेच गोल्डन या रंगाची प्लेन कापडातील मग ती सिल्क वेल्वेट असो यातील ब्लॉउज ठेवा. ज्यामुळे कोणत्याही साडीवर तुम्ही यातील ब्लॉऊज घालू शकता.

टिप नंबर 7- साडी कशावर नेसायची ?

साडी चापून चोपून दिसण्यासाठी जिन्स किंवा लेगिन्सवर नेसण्याचा प्रयत्न करा. स्वतःला स्टायलिश लूक द्यायचा असेल तर साडीच्या वरच्या बाजूला बेल्ट ट्राय करू शकता. याशिवाय आतून जो पेटीकोट वापरणार आहे तो देखील फिटींगचा वापरू शकाता.

वाचा-Bhogi 2022: मकर संक्रांतीच्या आदल्याच दिवशी का साजरी करतात भोगी?

या टिप्स वापरा आणि हळदी कुंकावच्या समारंभाला कमी वेळत सुंदर दिसा.

First published:

Tags: Festival, Lifestyle, Makar Sankranti