मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Happy Makar Sankranti 2022: मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणारे मराठमोळे शुभेच्छापत्रे, Facebook, WhatsApp Status

Happy Makar Sankranti 2022: मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणारे मराठमोळे शुभेच्छापत्रे, Facebook, WhatsApp Status

Happy Makar Sankranti 2022 messages in marathi whatsapp status: मकरसंक्रातीच्या निमित्ताने आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारे खास मसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे मेसेजेस तुम्ही एकमेकांना पाठवून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

पुढे वाचा ...

मुंबई, 13 जानेवारी : 2022 या नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्यातील मकरसंक्रांत हा पहिला सण (Makar Sankranti festival) आहे. हिंदू धर्मातील ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या दिवशी सूर्य धनु रास सोडून मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी मकरसंक्रांत साजरी केली जाते. भारतात प्रत्येक सण-उत्सवाला एक विशेष महत्व आहे. मकरसंक्रांतही संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मकरसंक्रांत भारतातील विविध भागांत वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. पंजाबमध्ये लोहडी, उत्तराखंडमध्ये उतरायणी, केरळात पोंगल म्हटलं जातं. यंदाच्या वर्षी पंचांगानुसार 14 जानेवारी 2022 रोजी म्हणजेच शुक्रवारी मकरसंक्रांत आहे.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना शुभेच्छा देत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असल्याने प्रत्यक्षात आपल्या नातेवाईक, मित्रांना भेटणं शक्य नसलं तरी काळजी करण्याचं कारण नाही तुम्ही एकमेकांना मेसेजेसच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकतात. मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणारे काही खास मेसेजेस Makar Sankranti messages, Happy Makar Sankranti 2022 HD images, Happy Makar Sankranti 2022 whatsapp status सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Happy Makar Sankranti 2022 Messages)

तिळगुळ घ्या, गोडगोड बोला...

मकरसंक्रांतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा

जपू तिळाप्रमाणे स्नेह

वाढवू गुळाप्रमाणे गोडवा

मकरसंक्रांतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा

तिळगुळ घ्या, गोडगोड बोला...

गुळाची गोडी

त्याला तिळाची जोडी

नात्याचा गंध

त्याला स्नेहाचा बंध

तिळगुळ घ्या, गोडगोड बोला...

मकरसंक्रांतीच्या गोड-गोड शुभेच्छा !

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या...

मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या..

या संक्रांतीला तिळगुळ खाताना आमची आठवण राहु द्या..

दु:ख असावे तिळासारखे,

आनंद असावा गुळासारखा,

जीवन असावे तिळगुळासारखे

मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

तिळाची ऊब लाभो तुम्हाला

गुळाचा गोडवा येवो जीवनाला

यशाची पतंग उडो गगनावरती

तुम्हाला मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक

स्नेहांचा तिळ मिळवा त्यात

तिळावर फुलेल पाकाचा काटा

प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा

मकरसंक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

तिळात मिसळला गुळ

त्याचा केला लाडू

मधुर नात्यासाठी गोड-गोड बोलू

संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

कणभर तीळ

मन भर प्रेम

गुळाचा गोडवा

आपुलकी वाढवा

तिळगुळ घ्या गोडगोड बोला

मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा

म - मराठमोळा सण

क - कणखर बाणा

र - रंगबिरंगी तिळगुळ

सं - संगीतमय वातावरण

क्रां - क्रांतीची मशाल

त - तळपणारे तेज

मकरसंक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

दु:ख असावे तिळासारखे,

आनंद असावा गुळासारखा,

जीवन असावे तिळगुळासारखे

मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

First published:

Tags: Festival, Makar Sankranti