जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ब्रेन स्ट्रोक आलेल्या व्यक्तीला समजदार व्यक्ती वाचवू शकतो; ही लक्षणं दिसली की ताबडतोब गाठा हॉस्पिटल

ब्रेन स्ट्रोक आलेल्या व्यक्तीला समजदार व्यक्ती वाचवू शकतो; ही लक्षणं दिसली की ताबडतोब गाठा हॉस्पिटल

ब्रेन स्ट्रोक आलेल्या व्यक्तीला समजदार व्यक्ती वाचवू शकतो; ही लक्षणं दिसली की ताबडतोब गाठा हॉस्पिटल

Causes of Stroke, how to know what Happened : मेंदूला झटका येणे ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे, ज्यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा खंडित होतो. नाहीतर मेंदूच्या आतील रक्तवाहिनी फुटते. या दोन्ही परिस्थितींमध्ये पुरेसा ऑक्सिजन मेंदूपर्यंत पोहोचत नाही. परिणामी, मेंदूची कार्य करू शकत नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 जानेवारी : स्ट्रोक (Stroke) कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. आजकाल बदलती जीवनशैली आणि तणावामुळे 30 ते 50 वयोगटातील लोकही याला बळी पडत आहेत. मेंदूला झटका येणे ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे, ज्यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा खंडित होतो. नाहीतर मेंदूच्या आतील रक्तवाहिनी फुटते. या दोन्ही परिस्थितींमध्ये पुरेसा ऑक्सिजन मेंदूपर्यंत पोहोचत नाही. परिणामी, मेंदूची कार्य करू शकत नाही. मेंदूच्या कोणत्याही नसांना इजा झाल्यास शरीराच्या विशिष्ट प्रकारच्या अवयवाचा अर्धांगवायूमुळे (Paralysis) होऊ शकतो. उदाहरणार्थ, मेंदूकडून पाय नियंत्रित करणाऱ्या नसेला इजा झाली, तर पायाचा अर्धांगवायू होऊ शकतो. त्याचप्रमाणे हातालाही अर्धांगवायू होऊ शकतो. स्ट्रोकची लक्षणे समजून घेऊन लगेच उपचार घेतल्यास जीव वाचू शकतो. स्ट्रोकचा प्रकार इस्केमिक स्ट्रोक (ischemic stroke) या प्रकारच्या स्ट्रोकमध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी गुठळ्या झाल्यामुळे अरुंद किंवा ब्लॉक होते. मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या आतील भागांमध्ये चरबी जमा झाल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. हा सर्वात सामान्य स्ट्रोक आहे. या स्थितीत मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळे मेंदूचे कार्य ठप्प होते. ट्रांजियंट इस्केमिक स्ट्रोक (transient ischemic stroke) जेव्हा रक्तवाहिन्यांद्वारे मेंदूला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही, तेव्हा त्या स्थितीला ट्रान्सिएंट इस्केमिक स्ट्रोक म्हणतात. बर्‍याच लोकांना स्ट्रोकची काही लक्षणे जाणवतात, परंतु ही लक्षणे एक-दोन दिवसात आपोआप कमी होतात. जसे की हात-पाय कमजोर होणे, बोलण्यात समस्या, चेहरा तिरकस होणे किंवा संतुलन बिघडणे. या लक्षणांना ओळखणे फार महत्त्वाचे आहे. ट्रान्झिएंट इस्केमिक स्ट्रोक (TIS) च्या बाबतीत ही स्थिती सर्वात सामान्य आहे. अशा स्थितीत लवकरच एखाद्या न्यूरो तज्ञाचा सल्ला घ्यावा. हेमोरेजिक स्ट्रोक (Hemorrhagic stroke) हेमोरेजिक स्ट्रोकला ब्रेन हॅमरेज (Brain Hemorrhage) असेही म्हणतात. ब्रेन हॅमरेज हा स्ट्रोकचा एक प्रकार आहे. ब्रेन हॅमरेज ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. ज्यामध्ये मेंदूची रक्तवाहिनी फुटते. ही परिस्थिती गंभीर अर्धांगवायूचे मुख्य कारण आहे. उच्च रक्तदाबामध्ये हेमोरेजिक स्ट्रोकची प्रकरणे अधिक असतात. मेंदूच्या धमन्या मेंदूच्या आतील भागात फुटतात. स्ट्रोकची लक्षणे कशी ओळखायची रुग्णाला वेळेत (स्ट्रोक आल्यानंतर 48 तासांच्या आत) चांगल्या रुग्णालयात दाखल केले तर जीव वाचू शकतो. यामुळेच स्ट्रोकची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे ‘BE FAST’ गणित समजून घेणे. हे वाचा -  Kidney Care Tips: किडनी निकामी करण्यास कारणीभूत ठरतात या 5 गोष्टी; आहारातील प्रमाण असावं मर्यादितच B- बॅलेंस (Balance) - स्ट्रोकपीडित व्यक्तीच्या शरीरावरील संतुलन बिघडते. तो नीट बसू शकत नाही आणि उभा राहू शकत नाही E- आईज (Eyes) - स्ट्रोक आलेल्या व्यक्तीला अचानक एका डोळ्यात किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये अंधुक दृष्टी येऊ लागली तर समजून घ्या की ही स्थिती स्ट्रोकशी संबंधित असू शकते. F-फेस (Face) - स्ट्रोकमध्ये, चेहरा एका बाजूला तिरकस होतो. यामध्ये त्या व्यक्तीला हसूही येत नाही किंवा चेहरा सरळ दिसत नाही असे घडते. A-आर्म्स (Arms)- स्ट्रोकमध्ये हात सैल होतात आणि त्यांची क्रिया नीट होत नाही. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे तर हातात जीव राहत नाही. S-स्पीक (Speak)- स्ट्रोकमध्ये पीडित व्यक्तीला बोलण्यात अडचण येते, त्याची जीभ अडखळू लागते. T-टाइम (Time)- स्ट्रोकमध्ये वेळ ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पक्षाघाताचा झटका आल्यास, वेळ न घालवता, रुग्णाला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जा, शक्यतो चांगल्या सुविधा असलेल्या रुग्णालयात न्या. जिथे एमआरआय, सीटी स्कॅन आणि उत्तम आयसीयू सुविधा आहेत. खबरदारी घेऊन धोका टळू शकतो रक्तदाब नियंत्रणात ठेवा, उच्च रक्तदाबामुळे पक्षाघाताचा धोका वाढतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा, त्याची वाढलेली पातळी उच्च रक्तदाबाची शक्यता वाढवते. हे वाचा -  लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा, मधुमेह असलेल्यांनी खाणे-पिण्यावर नियंत्रण ठेवा. वेळेवर औषध घ्या. लठ्ठपणा टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा, हिरव्या भाज्या आणि फळे खा. जर कुटुंबातील कोणाला हा त्रास झाला असेल तर सर्व खबरदारी घ्या, वैद्यकीय सल्ला घ्या. धूम्रपान आणि इतर मादक पदार्थ टाळा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात