मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Bhogi 2022: मकर संक्रांतीच्या आदल्याच दिवशी का साजरी करतात भोगी?

Bhogi 2022: मकर संक्रांतीच्या आदल्याच दिवशी का साजरी करतात भोगी?

 मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो. या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ तयार करण्यात येतात.

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो. या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ तयार करण्यात येतात.

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो. या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ तयार करण्यात येतात.

मुंबई, 13 जानेवारी: न खाई भोगी तो सदा रोगी’हे बऱ्याच जणांनी आपल्या आजीकडून नेहमी ऐकलं असेल. पण नेमकं भोगी (bhogi)ही भानगड काय असते? ती का साजरी केली जाते? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. तर जाणून घेऊया, मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti)आदल्याच दिवशी का साजरी करतात भोगी?

मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात. या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ तयार करण्यात येतात. माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी हा सण साजरा केला जातो.

महाराष्ट्रात (Maharashtra) भोगी हा उपभोगाचा सण म्हणून ग्रामीण आणि शहरी भागात साजरा केला जातो. संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो. फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं संबोधलं जाते. तामिळनाडूत हा सण 'भोंगीपोंगल’ म्हणून साजरा करतात. तर आसाममध्ये ‘भोगली बहू’ म्हणून साजरा करतात. तर पंजाबमध्ये ‘लोहिरी’,राजस्थानमध्ये ‘उत्तरावन’ म्हणून साजरा केला जातो.

भोगी म्हणजे काय?

आज 'भोगी'. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला 'भोगी' असे म्हणतात. 'भोगी' शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. 'भोगी' हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो.

भोगी का साजरी करतात?

या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेटही देत असे.

'भोगी' हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे. या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहारलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्याच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो. म्हणून या दिवशी 'भोगी'ची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला 'खिंगाट' म्हणतात. या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणार्‍या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खर्डा, सर्व शेंगभाज्या, पावटय़ाचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा बेत उपभोगायचा असतो.

मकरसंक्रांतीचं महत्त्व

मकरसंक्रांत म्हणजे, जानेवारी येणार पहिला सण. हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात मकरसंक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांती म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांत असं म्हणतात.

21-22 डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. अर्थातचं त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता 21-22 डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा या राशीला मकर संक्रांती म्हणतात. पंचांगानुसार, मकरसंक्रांतीचा उत्सव 14 जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते.

First published:

Tags: Makar Sankranti