शेतकरी बापाला असा सलाम कोणीच केला नसेल, या फोटोमागच्या लेकीची कहाणी उर भरून आणेल

शेतकरी बापाला असा सलाम कोणीच केला नसेल, या फोटोमागच्या लेकीची कहाणी उर भरून आणेल

लेकीचं तर शेतीसोबत आणि शेतात राबराब राबणाऱ्या बापाशी वेगळंच भावनिक नातं असतं.

  • Share this:

मनमाड, 12 जून : शेतकऱ्यांची मुलगी असो किंवा मुलगा त्यांची शेतीशी नाळ कायम जुडलेली असते. लेकीचं तर शेतीसोबत आणि शेतात राबराब राबणाऱ्या बापाशी वेगळंच भावनिक नातं असतं. लग्न झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या शेतीशी कायमच नातं तुटणार असल्याचं पाहून नवंवधूनं वराकडे सासरी जाण्या अगोदर माहेरी वडिलांच्या शेतात शेवटची पेरणी करण्याची इच्छा व्यक्त केली आणि वरानं पत्नीचा मान राखला.

या नवंदाम्पत्याने शेतात जाऊन भुईमुगाची पेरणी केली आणि आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात केली. खरंतर लग्न म्हटलं की ती सोन्या-चांदीची तयारी आणि प्री-वेडिंग शूट असा सगळा हल्लीचा पॅटर्न आहे. पण या सगळ्याला मोडता घालत आपल्या खऱ्या आईच्या कुशीत या दोघांनी प्रेमाचा दोर बांधला. त्यांच्या या निर्णयामुळं सध्या सर्वत्र या जोडप्याचं कौतूक सुरू आहे.

'धनंजय मुंडेंची दोनदा कोरोना चाचणी झाली पण...', राजेश टोपेंचा मोठा खुलासा

मुलगी आणि वडील यांच्यासह शेतीशी असलेलं भावनिक नातं सांगणारी ही आगळी वेगळी घटना नाशिकच्या चांदवडला घडली आहे. शेतात पेरणी करणारे हे नवं दाम्पत्य आहे संदीप व करुणा एळीनजे. या दोघांचं लग्न चांदवडला झालं. पण आपण ज्या शेतात वडिलांसोबत काम करत लहानाचं मोठं झालो त्या शेतीशी आपलं आता कायमच नातं तुटणार असल्याचं पाहून करुणाने पती संदीपला मला सासरी जाण्या अगोदर माहेरी असलेल्या वडिलांच्या शेतात शेवटची पेरणी करण्याची इच्छा व्यक्त केली.

चांदीच्या किंमतीत या महिन्यातली सगळ्यात मोठी घसरण, काय आहे 10 ग्राम सोन्याचा भाव

पती संदीपनंही पत्नीच्या इच्छाचा आदर करत तिच्यासोबत जाऊन शेतात भुईमुगाची पेरणी केली. आम्ही दोघे सुशिक्षित असून दोघांचे कुटुंबीय शेतकरी आहे. त्यामुळे आम्ही पुढे ही शेतीच करणार असल्याचं या नवं दाम्पत्यानं सांगितलं. आपल्या शिक्षणाचा शेतीच्या कामासाठी वापर करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला आहे.

'मी शेतकरी असून माझ्या सुनेनं शेतीला न विसरता लग्न होताच माहेरी शेतीत पेरणी केल्याचं पाहून मला खूप आनंद झाला.' असे संदीपचे वडील आणि करुणाचे सासरे बाळू एळीनजे यांनी सांगितलं. त्यांच्या या शब्दांमुळे खरा शेतकरी आपल्या शेतात धान्य नाही तर खरी नाती पिकवतो हे जाणवलं.

'या' बँकेमध्ये Saving अकाऊंट उघडणाऱ्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का!

ज्या मातीत आपण वावरून मोठं झालो. त्या मातीशी भावनिक नातं असतं. त्यामुळे त्याला विसरता येत नाही हे करुणानं दाखवून दिलं आहे. पण तिच्या शेती करण्याच्या निर्णयामुळे आणखी एक प्रगतशील शेतकरी आपल्या राज्याला लाभेल यात काही शंकाच नाही.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 12, 2020, 7:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या