Home /News /news /

चांदीच्या किंमतीत या महिन्यातली सगळ्यात मोठी घसरण, काय आहे 10 ग्राम सोन्याचा भाव

चांदीच्या किंमतीत या महिन्यातली सगळ्यात मोठी घसरण, काय आहे 10 ग्राम सोन्याचा भाव

कोरोनामुळे लॉकडाऊन असलेला देश आता अनलॉक होत आहे. त्यामुळे पुन्हा अर्थव्यवस्था सुरू होणार आहे. म्हणूनच शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे.

    नवी दिल्ली, 12 जून : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये आलेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) आज पुन्हा वाढले आहेत. शुक्रवारी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 153 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीची किंमत (Silver Price Declined) 665 रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमती घसरतील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण, कोरोनामुळे लॉकडाऊन असलेला देश आता अनलॉक होत आहे. त्यामुळे पुन्हा अर्थव्यवस्था सुरू होणार आहे. म्हणूनच शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. अशात गुंतवणूकदार आता सोन्यात नफा मिळवू शकतात. सोन्याचा नवा भाव (Gold Price on 12 June 2020) शुक्रवारी दिल्लीमध्ये 10 ग्राम सोन्याची किंमत 47,991 रुपयांवरुन 48,144 रुपये प्रति दहा ग्रामवर पोहोचली आहे. तर, गुरुवारी 10 ग्राम सोन्याची किंमत 47,713 रुपयांवरुन 48,190 वर पोहोचली आहे. याआधी बुधवारी दिल्लीमध्ये 10 ग्राम सोन्याची किंमत 47,419‬ रुपयांवरुन 47,664 रुपये इतकी झाली आहे. यावेळी किंमतीमध्ये प्रति दहा ग्रॅम 245 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. चांदीचे नवे भाव (Silver Price on 12 June 2020) शुक्रवारी दिल्लीत 1 किलो चांदीची किंमत 49,900 रुपयांवरुन 49,235 रुपयांवर आली आहे. यावेळी किंमत 665 रुपयांनी घसरली आहेत. गुरुवारी 1 किलो चांदीचा भाव 49,842 रुपयांवरुन 49,868 रुपयांवर आला होता. तर याआधी बुधवारी चांदीच्या दरात घसरण झाली होती. दिल्लीत एक किलो चांदीची किंमत 49,450 रुपयांवरुन 49,340 रुपयांवर आली होती. यावेळी किंमतीमध्ये 110 रुपयांनी घसरण झाली होती. याआधी मंगळवारी 1 किलो चांदीची किंमत 48,451 रुपयांवरून वाढून 49,344 झाली होती. तर यावेळी चांदीचे भाव 893 रुपयांपर्यंत वाढले होते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीचे दर प्रति औंस 17.63 डॉलरवर पोहोचला आहे. एक रुपयात करा सोनं खरेदी सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे ते खरेदी करणं प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसतं. परंतु तुम्हालाही सोनं घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही डिजिटल सोन्याच्या स्वरूपात कमी प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करू शकता. डिजिटल सोन्याच्या खरेदीमध्ये 24 कॅरेट म्हणजेच 99.99 टक्के शुद्ध सोनं डिजिटल पद्धतीनं सुरक्षित ठेवता येऊ शकतं आणि तुम्हाला हवं असेल तेव्हा त्याची विक्री करता येते. डिजिटल रुपात 1 रुपयालाही सोनं खरेदी करता येतं. यासाठी तुम्हाला कुठंही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून सोनं विकत घेऊ शकता. पेटीएम, गुगल पे सुद्धा तुम्हाला या सुविधा देत आहेत. वापरकर्त्यांना डिजिटल सोन्याची खरेदी आणि विक्री करण्याची परवानगी देण्यासाठी या अ‍ॅप्सनं एमएमटीसी-पीएएमपी सह भागीदारी केली आहे. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Gold and silver prices today

    पुढील बातम्या