निवडणुकीत एकच दादा, अजित पवार रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी

बारामती मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 12:54 PM IST

निवडणुकीत एकच दादा, अजित पवार रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी

बारामती, 24 ऑक्टोबर : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये बारामती मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. अजित पवार 24 व्या फेरीअखेर 1,49,077 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित झाला आहे.  तर गोपीचंद पडळकर यांचं डिपॉझिट जप्त करण्यात आलं आहे.

यंदाच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांची निवड केली होती. गोपीचंद पडळकर हेदेखील धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पवारांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून धनगर समाजातील नेत्यांना समोर आणण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते या परिसरातील जातीय समीकरण. बारामती मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाची मतं आहेत. त्यामुळे धनगर समाजातील मतदारांना चुचकारण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा होती.

बारामती मतदारसंघाचा EXIT POLL

बारामतीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी निवडणूक अवघड आहे, असा न्यूज 18 लोकमत आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अजित पवार यांच्याविरुद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली. गोपीचंद पडळकर हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये आले आणि त्यांना मुख्यमंत्र्यांनी थेट अजित पवार यांच्याविरुद्ध उमेदवारी दिली. त्यामुळे बारामतीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. इतर बातम्या -

इतर बातम्या - या मतदारसंघात चक्क ‘NOTA’ देतय दिग्गज उमेदवारांना टक्कर!

Loading...

बारामतीत भाजपने वंचितमधून आलेल्या गोपीचंद पडाळकर यांना उमेदवारी दिल्याने चुरस वाढली होती. तर अजित पवारांनी राज्यभर प्रचार करत बारामतीचा गढ सांभाळला होता. अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय प्रचारात गुंतले होते. तर शरद पवार यांनीही सभा करत मतदारांना भावनिक आवाहन केलं होतं. तर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बारामतीबद्दल काही वक्तव्य केल्याने मोठा वाद झाला होता.

इतर बातम्या - भाजपच्या सत्तेला धोका? महाराष्ट्राला मिळू शकतो नवा मुख्यमंत्री

बारामतीत भाजप वापरणार 2014 चा 'लोकसभा पॅटर्न'

भाजपकडून थेट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात रासपचे नेते महादेव जानकर यांना मैदानात उतरवून राज्यभर वातावरण निर्मिती केली होती. धनगर समाजाचे नेते असलेले जानकर तेव्हा विजयापासून दूर राहिले असले तरी त्यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज दिली होती.

यंदाच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांची निवड केली आहे. गोपीचंद पडळकर हेदेखील धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पवारांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून धनगर समाजातील नेत्यांना समोर आणण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते या परिसरातील जातीय समीकरण. बारामती मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाची मतं आहेत. त्यामुळे धनगर समाजातील मतदारांना चुचकारण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.

इतर बातम्या - विधानसभेचे पहिले 12 निकाल एका क्लिकवर, राणे, पवार आणखी कोण झालं विजयी?

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 12:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...