Marathwada Election Result 2019 LIVE : या मतदारसंघात चक्क ‘NOTA’ देतंय दिग्गज उमेदवारांना टक्कर!

Marathwada Election Result 2019 LIVE : या मतदारसंघात चक्क ‘NOTA’ देतंय दिग्गज उमेदवारांना टक्कर!

Marathwada Election Result 2019 Live Updates : कॉंग्रेस, सेना, भाजप नाहीतर 'या' मतदारसंघात नोटाची लाट.

  • Share this:

लातूर, 24 ऑक्टोबर : राज्य विधानसभेच्या 288 जागांपैकी मराठवाड्यातील 46 जागांच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. यात अनेक दिग्गज उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना रंगला आहे. एकीकडे लातूर शहर आणि ग्रामीण ही देशमुख कुटुंबासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या जागेवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष असताना मतदारांनी मात्र नोटाला प्राधान्य दिले आहे.

लातूर ग्रामीण मतदारसंघात धिरज देशमुख आघाडीवर असले तरी येथे त्यांना कोणताही उमेदवार नाही तर नोटा टक्कर देत आहे. या मतदारसंघात तब्बल 7 हजार 619 मतदारांनी 'नोटा'चं (None of the Above) बटण दाबलं आहे. विशेष म्हणजे, ही दुसऱ्या क्रमांकाची मते आहेत.

लातूर ग्रामीण हा लातूर तालुक्यातलाच 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत तयार झालेला मतदारसंघ. याआधी शिवराज पाटील आणि त्यानंतर विलासराव देशमुख यांच्यामुळं या लातूरवर कायमच कॉंग्रसचे वर्चस्व राहिले आहे. आता याच लातुरच्या ग्रामीण मतदारसंघातून दिवंगत विलासरावांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे सदस्य धिरज देशमुख आपले नशीब आजमावत आहेत. याआधी त्यांनी याच भागातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.

वाचा-Maharashtra Election Result 2019 LIVE:मुख्यमंत्री 50-50 हवा; भाजपच्या कामगिरीनंतर शिवसेनेची मोठी प्रतिक्रिया

विद्यमान आमदर त्र्यंबक भिसे यांनी 2014मध्ये भाजपच्या रमेश कराड यांना अटीतटीची लढत देत ही जागा आपल्या नावावर केली होती. त्यामुळं यंदा अशीच जादू धीरज दाखवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.धीरज हे ग्रामीणमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. तर अमित दुसऱ्यांदा आपलं नशिब आजमावत आहे.

धिरज यांना या मतदारसंघात शिवसेनेचे सचिन देशमुख यांचं आव्हान होतं. तर, अर्जुन वाघमारे हे अपक्ष म्हणून लढले होते. मात्र, सुरुवातीपासूनच या मतदारसंघात धिरज आघाडीवर आहेत. एवढेच नाही तर धिरजच्या प्रचारासाठी सिनेअभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी मोठ्या उत्साहाने केलाय, शिवाय हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार धिरज देशमुख हे आघाडीवर आहेत. मात्र त्यांच्या पाठोपाठ 'नोटा'ला 7 हजार 619 मते मिळाली आहेत.

वाचा-धनंजय मुंडेना 18 हजारांची आघाडी, पंकजा मुंडेची धाकधुक वाढली

2014 विधानसभा निवडणूक निकाल

कॉंग्रेस- त्र्यंबक भिसे (100798)

भाजप-रमेश कराड (90387)

शिवसेना- हरिभाऊ साबदे (3085)

राष्ट्रवादी- आशा भिसे (2672)

Published by: Priyanka Gawde
First published: October 24, 2019, 12:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading