विधानसभेचे पहिले 12 निकाल एका क्लिकवर, राणे, पवार आणखी कोण झालं विजयी?

विधानसभेचे पहिले 12 निकाल एका क्लिकवर, राणे, पवार आणखी कोण झालं विजयी?

भाजपच्या मोठ्या नेत्यांचा विजय झाला आहे तर काही ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी पहिले 4 निकाल समोर आले आहेत. यामध्ये भाजपच्या मोठ्या नेत्यांचा विजय झाला आहे तर काही ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसला आहे. कणकवलीतून नितेश राणे यांचा विजय झाला आहे बोरिवली मतदारसंघातून भाजपचे सुनील राणे विजयी झाले. नंदुरबारमधून भाजपचे विजय गावित यांचा विजयी झाला आहे तर सांगली - पलूस - कडेगाव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम हे विजयी झाले आहेत.

- नवापूरमध्ये काँग्रेसचे शिरीष नाईक विजयी

- बारामतीतून राष्ट्रवादीचे अजित पवार विजय

- चिपळूनमधून राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी

- घाटकोपर पूर्वमधून भाजपचे पराग शहा विजयी

- कोपरी-पाचपाखाडीमधून शिवसेनेचे एकनाथ शिंदे विजयी

- ठाणे शहर मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर विजयी

- कळवा-मुंब्रातून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड विजयी

- ओवळा माजीवाडा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक विजयी

कणकवली-वैभववाडी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितेश राणे विरुद्ध शिवसेना उमेदवार सतीश सावंत अशी चुरशीची लढत आहे. मात्र जनतेनं नितेश राणेंना मोठा कौल दिल्याचं पाहायला मिळत आहे.कणकवली-देवगड मतदारसंघात पुन्हा एकदा नितेश राणे बहुमतानं विजयी झाले आहेत. विधानसभेची मतमोजणी पूर्ण होण्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला होता. नितेश राणे यांनी बहुमताने आघाडी घेतल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला होता. नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती. उद्धव ठाकरे देखील सभेसाठी आले होते.

विक्रोळी मतदात संघातून 14व्या फेरीमध्ये शिवसेनेचे सुनील राऊत  20 हजार 119 मतांनी विजयी झाले आहेत. सुनील राऊत (शिवसेना)- 2715 एकूण - 48365 तर धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी) - 2098 एकूण - 28246 अशा मतांचा फरक आहे.

सांगली - पलूस - कडेगाव - काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम हे विजयी झाले आहेत. 9 व्या फेरी अखेर 1 लाख 500 ने आघाडीवर आहेत. एकूण 1 लाख 30 हजार मतांची मोजणी झाली आहे. त्यामुळे 70 हजार मतमोजणी बाकी असून कदम हे 1 लाखाने लिडवर आहेत.

सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला निर्णायक आघाडी असली तरी अनेक धक्कादायक निकाल येण्याची शक्यता आहे. राज्यमंत्रीमंडळातले 6 दिग्गज मंत्री ही बातमी लिहित असताना पिछाडीवर होते. यात पंकजा मुंडे, राम शिंदे, मदन येरावार, अतुल सावे, भाळा भेगडे, अनिल बोंडे आणि रवींद्र चव्हाण या मंत्र्यांचा समावेश आहे. परळीतून पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतलीय तर कर्जत- जामखेडमधून भाजपचे राम शिंदे यांच्याविरुद्ध रोहित पवार यांनी आघाडी घेतलीय.

निवडणुकीत हे महत्त्वाचं

- राज्याच्या एकूण 288 जागांपैकी 62 जागा विदर्भात आहेत.  भारतातल्या 9 राज्यात असलेल्या एकूण मतदारसंघापेक्षा जास्त जागा फक्त विदर्भात आहे.

- 1985 नंतर राज्यात कुठल्याही एका पक्षाला बहुमताची मॅजिक फिगर असलेला 145 चा आकडा गाठता आलेला नाही.

- 1990 मध्ये काँग्रेस बहुमतापासून फक्त 4 जागा दूर होते.

- 1995 पासून राज्यात युती किंवा आघाडीची  सरकारं यायला सुरुवात झाली.

- 1995 मधलं युती सरकार हे महाराष्ट्रातलं पहिलं बिगर काँग्रेसी सरकार होतं.

- नागपूर ही महाराषट्राची उपराजधानी असलेल्या विदर्भात लोकसभेचे 11 मतदारसंघ आहेत.

- विदर्भाने महाराष्ट्राला मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस असे चार मुख्यमंत्री दिले.

- विदर्भातल्या पुसद या मतदार संघातून वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री राज्याला मिळाले.

- मुख्यमंत्र्याशिवाय महाराष्ट्र सरकारमधले सुधीर मुनगंटीवार, मदन येरावार, परिणय फुके हे मंत्री यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

- अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचे पती रवी राणा अपक्ष म्हणून बडनेरा मतदारसंघातून लढत आहेत.

- विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा असून त्यासाठी 739 उमेदवार रिंगणात आहेत.

- लोकसभा निवडणुकीत 50 विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेनं आघाडी घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2019 12:15 PM IST

ताज्या बातम्या